Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

महिलेचा विनयभंग करून मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल



अमळनेर प्रतिनिधी : शहरातील पारोळा रस्त्यावरील पैलाड भागात राहणाऱ्या एका महिलेला तिच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली असून अमळनेर पोलीस स्टेशन ला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     

शहरातील पैलाड भागात एक महिला आपल्या कुटुंबासोबत राहते.२५ रोजी सकाळी ती तिच्या नातवाला अंगणात खेळवत असतांना तिच्या घराशेजारील घरातून धूर आल्याने कोणत्या नालाईकाने धूर उडवला अस ती म्हटली.या बोलण्याचा राग आल्याने शेजारी राहणारे गुलाब भोई,कैलास भोई,रवींद्र भोई या तिघांनी त्या महिलेला मारहाण करायला सूरवात केली.रवींद्र भोई याने त्या महिलेची साडी ओढुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तर कैलास भोई याने लोखंडी वस्तूच्या सहाय्याने हातास मारून दुखापत केली.सोबतच त्या तिघांनी महिलेच्या पतीला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.


महिलेच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ. गणेश पाटील हे करत आहेत.
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध