Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ डिसेंबर, २०२४
वाघाडी जवळ पावणे तीन लाखांचा दारुसाठा जप्त...!
शिरपूर प्रतिनिधी:-गुजरात येथून महाराष्ट्रात विदेशी मद्याची तस्करी करणारे वाहन तालुक्यातील वाघाडीनजिक जप्त करण्यात आले. या कारवाईत २ लाख ७६ हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली. ही कारवाई दि.२४ रोजी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली.
याबाबत वृत्त असे की, नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. त्या अनुषंगाने तालुक्याच्या सीमावर्ती गस्त वाढविण्यात आली आहे. दि. २४ रोजी गस्त घालीत असर्ताना गुजरात राज्यातून शिरपूरकडे अवैध दारु वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळाली,
माहितीच्या आधारे तालुक्यातील शिरपूर-शहादा रस्त्यावर वाघाडी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ सापळा रचण्यात आला. मध्यरात्रीच्या वेळी शहाद्याकडून शिरपूरकडे भरधाव वेगात मिनी ट्रक संशयास्पद येतांना पथकाच्या निदर्शनास आले. संशयावरुन वाहन (जीजे ०५ बीयू ०७०९) अडविण्यात आले. चालकास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पथकाने वाहनाची झडती घेतली असता वरच्या बाजूने प्लस्टिकचे कॅरेट दिसून आले. मात्र आत डोकावून पाहिले असता दारूसाठा मिळून आला.
या कारवाईत पंजाब राज्यात निर्मित रॉयल चॅलेज व्हिस्कीचे १५ खोके, रॉयल जनरल व्हिस्कीचे ५ खोके, मध्यप्रदेश निर्मित पॉवर कुल स्ट्रॉग बियरचे ६० खोके त्याची किंमत २ लाख ७६ हजार असून वाहनासह एकूण ६ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहन चालक मुकेश रामचंद्र सहानी (३२) रा. सुरत (गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमचे कलम ६५ (अ), (ई), ८३, ९० व १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक देविदास नेहूल करीत आहेत. संशयित सहानी याला शिरपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल, दुय्यम निरीक्षक ए.सी. मानकर, बी.एस. चौथवे, के.एम. गोसावी, प्रतिकेश भामरे, अमोल धनगर, रवींद्र देसले यांच्या पथकाने केली.
दोन दिवसांपूर्वी उमर्दा व बोराडी येथे बनावट देशी दारुचे कारखाने उध्वस्त करण्यात आले होते. तालुक्यात अवैध दारू वाहतूकीने थैमान घातले आहे. मात्र प्रत्येकवेळी चालकाव्यतिरीक्त कोणावरही गुन्हा दाखल होत नाही. शेकडो गुन्ह्यांमध्ये अवैध दारू वाहतूकीचा खरा मालक कोण तेच पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला आजतागायत शोधता आलेले नाही. कारवाई होते परंतु मुख्य सूत्रधार कधीच मिळून येत नाही यामागचे गौडबंगाल जनतेला कळले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा