Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

दिवसेंदिवस वाढणाऱ्या रासायनिक खतांना वापरावा वर अंकुश आणण्यासाठी पोशिंदाची शंभर टक्के ऑरगॅनिक खते वापरा आणि आपल्या मातीची आणि पिकाची गरज ओळखा.



जमिनीची सुपिकता वाढण्यासाठी योजना राबविण्याची आवश्यता
शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाची मागणी
देशातील शेतजमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खताचे बियाणे १०० टक्के अनुदानाने उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात यावी,अशी मागणी राज्यातील शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अॅड.प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे संबंधित विभागाचे आयुक्त चंद्रमोहन यांची भेट घेवून करण्यात आली.यावेळी नाशिक येथील कृषीभूषण उत्तमराव ठोंबरे,तहऱ्हाडी (ता.शिरपूर) येथील कृषीभूषण सुदाम करके उपस्थित होते.
जमिनीत सतत पिके घेणे,सेंद्रिय खतांचा वापर कमी होणे यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब अत्यंत कमी झालेला आहे.जमिनीचा सामू वाढलेला आहे.यामुळे जमीन कडक होऊन सुपिकता कमी झालेली आहे.जमिनीतून पाहिजे ते उत्पादन येत नाही. उत्पादन
खर्च वाढत होत असून सेंद्रिय खतांचा वापर कमी असला तर सेंद्रिय कर्ब कमी होतो.सेंद्रिय कर्ब कमी झाल्यास जमिनीत जिवाणूंची संख्या कमी होते.हे जिवाणु कोणत्याही खताचे (रासायनिक व सेंद्रिय) अन्नद्रव्यात रुपांतर करतात.हे रुपांतर कमी झाले तर दिलेले रासायनिक खत पिकांना उपलब्ध न होता जमिनीत पडू न राहतात.परिणामी जमिन खराब होत असून उत्पादन कमी होत आहे. याउलट उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ होत आहे. शेतजमिनीतील
सेंद्रिय कर्ब वाढविणे महत्वाचे आहे.यासाठी सर्वात महत्त्वाचे जमिनीत हिरवळीचे पीक घेऊन जमिनीत गाडणे आणि त्याला लागणारे बियाणे महाग असल्याने शेतकरी हा प्रयोग करत नाहीत.यासाठी केंद्र सरकारने २००७ ला राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आणली.यात पिकांची उत्पादकता वाढविणे,शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढविणे,जमिनीची सुपीकता वाढविणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत.या योजनेवर आता जवळपास
दोन लाख कोटी रुपये खर्च केला जात आहे.मात्र हा सर्व खर्च पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी केला जात आहे.यात जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी कोणताही खर्च केला जात नाही.वास्तविक जमिनीची सुपीकता वाढल्याशिवाय पिकांची उत्पादकता वाढविणे शक्य नाही.म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीच्या खाताचा वापर करावा तसेच आपल्या खतात रासायनिक खतांचा वापर कमी करून पोशिंदाचे ऑरगॅनिक फर्टीलायझर वापरा जेणेकरून येणाऱ्या काळात आपली जमिनीची गुणवत्ता टिकून राहील.यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून पोशिंदाची दर्जेदार ऑरगॅनिक खते वापरणे काळाची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध