Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या व्यक्तव्याचा निषेध...!



शिरपूर प्रतिनिधी:- बिड येथील सभेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत सर्व पक्षीय मुकमार्चा काढण्यात आला होता, त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या संशयीत फरार आरोपी वाल्मीक कराड यांच्या बाबतीत बोलतांना महर्षी वाल्मीक ऋषी यांच्याबद्दल अपशब्द बोलुन व फरार आरोपी वाल्मीक कराड यांची तुलना महर्षी वाल्मीक ऋषी यांच्याशी करून त्यांच्या नावाचे उदाहरण देवुन महर्षी वाल्मीक ऋषी यांचा अपमान केला त्यांच्या त्या वक्तव्याचा निषेद शिरपूर तालुका वाल्मिकी कोळी समाजामार्फत करण्यात आला आहे.
                       
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुध्द शासनाकडुन गुन्हा दाखल करण्यात येवुन महर्षी वाल्मिक ऋषी व कोळी समाजाची जाहिर माफी मागण्यात यावी अन्यथा कोळी समाजाच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांना निवेदन यांना दिले.याप्रसंगी विनायक कोळी, पवन सोनवणे, राहुल ईशी, किरण कोळी, सोमनाथ धनगर, प्यारे मोहन, समाधान कोळी आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध