Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ जानेवारी, २०२५
Home
/
Unlabelled
/
गाव पातळीवरील माहितीने महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यात पोलीस पाटलांची मदत- माजी मंत्री अनिल पाटील
गाव पातळीवरील माहितीने महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यात पोलीस पाटलांची मदत- माजी मंत्री अनिल पाटील
मारवड येथे पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्ह्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी अमळनेर-
पोलीस व महसूल प्रशासनातील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील पदाची निर्मिती शासनाकडून करण्यात आली असून त्याच अनुषंगाने अनेक प्रशासकीय विभागांसाठी पोलीस पाटलांच्या सहकार्याची गरज भासते म्हणूनच आजही पोलीस व महसूल विभागाच्या कार्यात पोलीस पाटलांकडून मिळणाऱ्या माहितीने प्रशासकीय कार्यात मदत होते,यामुळे गावागावात शांतता, ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी पोलीस पाटील दिना निमित्त २४ रोजी मारवड येथे आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत नवीन तीन फौजदारी कायदे ज्यात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा विषयी माहिती देण्यात आली.
सुधारित अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध जुना व नव्या कायद्याच्या अंमलबजावणीत गाव पातळीवर पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची असल्याचे मत प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी मांडले.
यावेळी प्रशासनाला वेळोवेळी मदत व उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस पाटील यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिस पाटील संघटना दरवर्षी पोलीस पाटील दिन साजरा करत असते,या वर्षी देखील मारवड पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन पोलीस पाटलांकडून करण्यात आले होते.
यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी पोलीस पाटलांची प्रशासनास नेहमीच मदत होत असल्याचे सांगून या पुढे देखील वेळोवेळी सहकार्य अपेक्षित राहील अशी आशा व्यक्त केली तर कायदा व सुव्यवस्था हाताळताना पोलीस पाटलांची मदत व सहकार्यामुळे गुन्हेगारीवर आळा बसवता येतो असे प्रतिपादन मारवड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यानी केले.
खासदार स्मिता वाघ यांनी देखील कार्यक्रम स्थळी भेट देवून पोलिस पाटील यांना पोलिस पाटील दिना निमित्त शुभेच्छा दिल्यात. यावेळी शांतता समितीचे सदस्य पत्रकार वसंतराव पाटील, पीएसआय विनोद पाटील, गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील, जळगाव हुन प्रशिक्षक वाघमारे, डॉ.इस्लाम, पत्रकार विलास पाटील, यदुविर पाटील, पोलीस पाटील संघटनेचे खान्देश अध्यक्ष प्रविण गोसावी, जिल्हाध्यक्ष नरेन्द्र शिंदे, राज्य संघटक भाऊसाहेब पाटील, राज्य सदस्य भागवत पाटील, जिल्हा सचिव लखीचंद पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष गोविंदा शिंदे, पारोळा तालुकाध्यक्ष विश्वास शिंदे, दिनकर पाटील, धुळे तालुकाध्यक्ष व विविध पदाधिकारी तसेच मारवड व अमळनेर पोलिस स्टेशन सह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील बहुसंख्य पोलिस पाटील सह मारवड, पाडळसरे ग्रामस्थ व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन पोलीस पाटील गणेश भामरे (बाम्हणे) यांनी तर प्रास्ताविक दत्तात्रय ठाकरे (वावडे) व आभार प्रदर्शन भाऊसाहेब पाटील (सबगव्हाण) यांनी मानले, या वेळी शांतता समितीचे सदस्य पत्रकार वसंतराव पाटील यांनी पोलीस पाटील दिनाचे महत्व विषद केले त्यांचा सह महिला पोलिस पाटील वसुंधरा पाटील (कलाली) यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारवड पोलीस पाटील मित्र परिवाराने परिश्रम घेतले".
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा