Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील गाळ ठरतोय डोकेदुखी ; साक्रीतील सर्वच धरणांत सुमारे ५० टक्के गाळ
धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांतील गाळ ठरतोय डोकेदुखी ; साक्रीतील सर्वच धरणांत सुमारे ५० टक्के गाळ
धुळे प्रतिनिधी : जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांत गाळ साचला आहे. यामुळे सिंचन प्रकल्प उन्हाळ्याच्या मध्यात किंवा एप्रिलमध्येच कोरडे होतात किंवा त्यातील जलसाठा कमी होतो. हा गाळ काढून प्रकल्प कसे १०० टक्के पाण्याच्या क्षमतेने भरतील, असाही मुद्दा आहे.
शिरपुरातील अनेर, धुळे तालुक्यातील सोनवद, शिंदखेड्यातील अमरावती आदी प्रकल्पांतही गाळ आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे अनेकदा दुष्काळाचे सावट असते.
यंदा पाऊस झाला. पण सिंचन प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे, अशी स्थिती नाही. कारण प्रकल्पांत गाळ आहे. आपत्तीमुळेच नव्हे तर शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जलसंकट तयार होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कारण दर वर्षी सिंचन प्रकल्पांतील गाळ वाढत आहे. मध्यम, लहान-मोठ्या प्रकल्पांतील गाळ काढणे आवश्यक आहे. साक्री तालुक्यातील सर्वच लहान-मोठ्या धरणांत सुमारे ५० टक्के गाळ साचल्याची स्थिती आहे.गेल्या वर्षी गाळामुळे जलसाठा संपुष्टात आला. दुष्काळाचे चटके अधिकच सहन करण्याची वेळ आली. हे. गाळ अधिक साचल्यामुळे पाणीसाठा कमी असतो. दरवर्षी पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली असल्याची स्थिती अनेक भागात आहे. गाळ काढण्यासाठी शासनाची उदासीनता दिसून येते. शासनाने 'गाळमुक्त धरण' अशी अभिनव योजना आणली होती. शासनाच्या अनेक योजना कल्याणकारी असतात यात शंकाच नाही.
पण राबविणारी यंत्रणा, अधिकारी यांनी पोटतिडकीने काम करणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. गाळमुक्त धरण योजनेत शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चात गाळ काढून न्यावा अशी तरतूद होती. पण त्याबाबत सध्या कुठेही सकारात्मक चित्र शासनस्तरावर दिसत नाही.
गाळाचा खर्च न परवडणारा
गेल्या वेळेस फेब्रुवारी महिन्यात साक्री तालुक्यातील तीन मध्यम व आठ लघु प्रकल्प मिळून एकत्रित सरासरी केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. आहे. साक्री तालुक्यात आदिवासी भागातील काबऱ्याखडक, लाटीपाडा, मालनगाव, जामखेली यांसारखे प्रकल्प आहेत. धरण क्षेत्राजवळ असलेल्या आदिवासी बांधवांना गाळ काढून नेण्यासाठीचा खर्च न परवडणारा आहे. शासकीय मदत मिळाल्यास गाळमुक्त धरण योजनेस बळ मिळणार आहे. तालुक्यात प्रमुख तीन मध्यम, तर आठ लघु प्रकल्प आहेत. सद्यःस्थितीत पिंपळनेरच्या लाटीपाडा प्रकल्पाची पाणीसाठ्याची क्षमता १,२५८ एमसीएफटी आहे.पण एवढे पाणी त्यात साचत नाही. मालनगाव प्रकल्पाची पाणीसाठ्याची क्षमता ४१० एमसीएफटी असून, प्रत्यक्षात एवढा जलसाठा चांगला पाऊस झाल्यानंतरही नसतो.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा