Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ मार्च, २०२५
Home
/
Unlabelled
/
शहादा तालुक्यात भीषण अपघात: विद्यार्थ्यांच्या वाहनाला आयशर ट्रकची जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू, 8 ते 10 विद्यार्थी गंभीर जखमी
शहादा तालुक्यात भीषण अपघात: विद्यार्थ्यांच्या वाहनाला आयशर ट्रकची जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू, 8 ते 10 विद्यार्थी गंभीर जखमी
शाहदा प्रतिनिधी:- शहादा तालुक्यातील तोरखेडा येथून सकाळी 7.30 वाजता शिरपूरकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या MH.41.V.0014 क्रमांकाच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे.या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे शहादा कडून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने विद्यार्थ्यांनी भरलेली गाडी पूर्णतः उध्वस्त झाली. या अपघातात १० ते १२ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालय व काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.या दुर्दैवी अपघातात गाडीच्या मागील बाजूस उभे असलेले प्रशांत भगवान घोरपडे (वय २१) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत ते जागच्या जागी कोसळले आणि त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत झाला.अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी अवैध प्रवासी वाहतुकीवर नाराजी व्यक्त केली.
या अपघातामुळे अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक योग्य नियोजनाअभावी धोकादायक परिस्थितीत होत आहे, हे या अपघातावरून स्पष्ट झाले आहे.
घटनास्थळी सारंखेडा पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना प्रशासनासाठी आणि स्थानिकांसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे.अशा प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा