Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ मार्च, २०२५
भोई गौरवद्वारे घेण्यात आलेली काव्य वाचन स्पर्धा थाटात संपन्न..!
नागपूर प्रतिनिधी:-भोई गौरव (मासिक) नागपूर द्वारे 23 मार्चला 2025 ला.स्व. अनंतराव बावणे स्मृती काव्य वाचन स्पर्धा व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉन्फरन्स हॉल उर्वेला कॉलनी वर्धा रोड नागपूर येथे घाटात संपन्नसंपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक संपादक श्री.अविनाश महालक्ष्मे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर चित्रपट व नाटक कलावंत शैल जेमिनी,साहित्यिक व कवी डॉ वर्षा गंगणे, कृषी वैज्ञानिक
डॉ. प्रदीप दवणे,भोई गौरवचे मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे,कवी संमेलनाचे परीक्षक डॉ.बळवंत भोयर, प्रकाश दुलेवाले, स्व.अनंतराव बावणे यांच्या पत्नी अनिता बावणे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक चंद्रकांत लोणारे यांनी केले तर तीन तास चाललेल्या या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भारती दवणे व प्रा.राहुल गौर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय चित्रा मेश्रे यांनी करून दिला
या काव्यवाचन स्पर्धेत विदर्भातील 35 कवी सहभागी झाले होते. डिसेंबर जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या दोन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजय स्पर्धकांना या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच विजय कवींना पुरस्कार व सहभागी कवींना सहभाग सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.आपल्या अध्यक्षीय भाषणात शौल जेमिनी यांनी सर्व कवींचे तोंड भरून कौतुक केले व सर्वांना उज्वल भविष्यसाठी शुभेच्छा दिल्या, दर्जेदार व नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मासिकाचे सहसंपादक गजानन
गाळवेकरकर, चित्रा मेश्रे, राहुल गौर,सुशीला लोणारे,अनुप बावणे, अनिल बावणे, अरुणा कुलकर्णी,
अनिता बावणे सुशीला लोणारे.मृणाल लोणारे, वैभव घोडे, किशोर ढाले, उदय लाड, इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला भोई गौरवचे सभासद, हितचिंतक तसेच रसिकमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा