Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ एप्रिल, २०२५
महाराणा परिवाराला सांत्वन पर भेट!
शिरपुर (प्रतिनिधी) उदयपूर (राजस्थान) येथील महाराणा प्रतापसिंह यांचे ७६ वे वंशज मेवाड़, उदयपूर राजघराण्याचे श्री जी हुजूर अरविंदसिंहजी मेवाड यांच्या निधनानंतर दि. १/०४/२०२५ रोजी, सायंकाळी धुळे जिल्ह्यातील महाराणा प्रताप स्मारक अभियान समितीचे पदाधिकाऱ्यांनी उदयपूर येथील शंभु निवास सिटी पॅलेस, येथे जाऊन त्यांचे सुपुत्र तथा महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे राष्ट्रीय संरक्षक श्री. महाराज कुमार साहेब डॉ. लक्ष्यराजसिंहजी मेवाड़ तसेच त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी श्री जी हुजुर अरविंदसिंहजी मेवाड यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे राष्ट्रीय प्रबंधक कमिटी सदस्य श्री.भानुप्रताप सिंहजी नाहरगढ, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री. रवींद्रसिंहजी गिरासे (सोमु भैय्या) आराळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सचिन राजपूत सावळदे, श्री.राजपुत करणी सेना धुळे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रदीप राजपूत भावेर, धुळे जिल्हा अध्यक्ष श्री. योगेश राजपूत भटाणे, क्षत्रिय करणीसेनेचे खानदेश प्रदेश अध्यक्ष श्री.विरपालसिंह राजपूत शिरपुर, पिंप्रीचे पोलिस पाटील श्री.जयपालसिंह गिरासे,श्री. कृष्णा राजपूत सावळदे आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा