Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५
शिरपूरमध्ये नगरसेवकाच्या मुलीने केले अतिक्रमण, नागरिकांचा संताप
शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील स.नं. ६/१/ब/१/ब मध्ये स्थानिक नगरसेवकाच्या मुलीने अतिक्रमण केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होत असून, त्यांनी नगरपरिषदेकडे तक्रार दाखल केली आहे.
नागरिकांच्या तक्रारीनुसार, नगरसेवकाच्या मुलीने त्यांच्या कॉलनीतील मोकळ्या जागेवर अतिक्रमण केले आहे. या जागेवर एक परप्रांतीय व्यक्ती राहत असून, तो नगरसेवकाच्या मदतीने हे अतिक्रमण करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या व्यक्तीने जवळपास ८-१० फूट अतिक्रमण करून पत्र्याचे शेड बांधले आहे.
या अतिक्रमणामुळे कॉलनीतील नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. तसेच, या जागेचा गैरवापर होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही नागरिकांनी १३/०१/२०२५ आणि १३/०२/२०२५ रोजी नगरपरिषदेकडे तक्रारी अर्ज दाखल केले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
अतिक्रमणधारक नगरसेवक पदावर राहण्यास अपात्र ठरत असतानाही नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे. नगर प्रशासनाने स्थानिक नेत्यांच्या दबावापुढे नतमस्तक होऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नगरपरिषदेने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा