Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १२ एप्रिल, २०२५
Home
/
Unlabelled
/
राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, गृहनिर्माण योजनेत आणि सर्व प्रकारचा एस.टी. बस प्रवास सवलत मिळेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना
राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, गृहनिर्माण योजनेत आणि सर्व प्रकारचा एस.टी. बस प्रवास सवलत मिळेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना
राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली.यावेळी पत्रकार सन्मान योजना, गृहनिर्माण,आरोग्य सेवा व प्रवास सवलती यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील अटींचा पुनर्विचार करत अनुभवाची अट 30 वर्षांवरून 25 आणि वयोमर्यादा 60 वरून 58 वर्षांवर आणण्याच्या पत्रकार संघटनांकडून आलेल्या मागणीनुसार, यासंदर्भात सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
कांदिवलीतील पत्रकार गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचे दर कमी करण्यासाठी म्हाडाने योग्य तो तोडगा काढावा,शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी निधीअंतर्गत वैद्यकीय मदतीची मर्यादा वाढवण्याबाबत विचार करण्यात यावा, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेसोबत सुसंगत योजना तयार करून त्याद्वारे पत्रकारांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा,यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटी महामंडळाच्या शिवनेरी व शिवाई बसमध्ये सवलत देण्यासंबंधी योग्य निर्णय घेण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मंत्रालय प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘फेशियल रिकग्निशन’ प्रणालीची अंमलबजावणी येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.
या बैठकीस मुख्य सचिव,पोलीस महासंचालक, अपर मुख्य सचिव,प्रधान सचिव तसेच मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
तरूण गर्जना रिपोट :_ २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभाग...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल कावठे (साक्री) येथील तीन शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य इंग्लिश मीडियम...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकली अमळनेर प्रतिनिधी : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते ...
-
तरूण गर्जना रिपोट अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दोन्ही गटा...
-
पोशिंदा ऑरगॅनिक पुणे ही कंपनी आपल्याला दर्जेदार ऑरगॅनिक खते उपलब्ध करून देते तेही अगदी योग्य दरात शेतकरी हित जोपसणारी कंपनी म्हणून पोशिंदा ...
-
जळगाव जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृष...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा