Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

२८ सप्टेंबरपर्यंत मासळी बाजार हलवला नाही तर दादरकरांचा तीव्र आंदोलनाचा इशारा..!



मुंबई प्रतिनिधी: महेश कदम / दादर, येथील खाऊक मासळी बाजार गेले पंचवीस वर्षापासून रस्त्यावर असल्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे, वाहतूक कोंडी, जाणारे येणारे पादचारी, शाळेत जाणारे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, तसेच रस्त्यावर ह्यांचे चालेले बेकायदेशीर मासळी धंदे, थर्माकोल, भुसा, डबल पार्किंग, रस्त्यावर पडलेले मासेचे सांडपाणी, मासे विकणारे यांचे अफाट गर्दी असल्यामुळे स्थानिक रहिवासी ह्यांना इतकी वर्ष हा त्रास सहन करावा लागत आहे, यामध्ये वाहतूक पोलीस ही लक्ष देत नाही व बीएमसी ही कारवाई करत नाही. बेकायदेशीर रस्त्यावर खुलेआम काटेवर चाललेल्या या धंदेमुळे रस्ते अपघात होत असतात, या मासळी बाजार मुळे कचरा, सांडपाणी, मच्छर, दुर्गंधी वास, याची रोगराई पसरल्यामुळे स्थानिक रहिवासी स्वराज्य गृहनिर्माण सोसायटी व पादाचारी यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे, सोसायटीने अनेक तक्रारी करून सुद्धा बीएमसी व पोलीस लक्ष देत नाही. म्हणून ह्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी रहिवासी यांची मागणी आहे. 

यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत जी/नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. विनायक विसपुते,  झोन–२ चे उपआयुक्त श्री. प्रशांत सपकाळे, दक्षिण मध्य मतदारसंघाचे खासदार श्री.अनिल देसाई,  बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. मनीष वालांजु आणि माहिमचे आमदार श्री. महेश सावंत, श्री.प्रकाश पाटणकर, प्रीती पाटणकर मॅडम, प्रवीण नरे, जितेंद्र कांबळे, अक्षता तेंडुलकर मॅडम, इतर पक्षाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत स्वराज्य सोसायटीसह २०० हून अधिक स्थानिक रहिवाशांनी सेनापती बापट मार्गावरील मासळी बाजार पुन्हा सुरू करण्यास जोरदार विरोध दर्शविला. बैठकीदरम्यान दक्षिण मध्य मतदारसंघातील खासदारांनी बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना मासळी बाजार हलवण्याचे निर्देश दिले. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, माहिमचे आमदार व जी/नॉर्थचे सहाय्यक आयुक्त यांच्या सल्लामसलतीनंतर तात्पुरत्या ठिकाणाची निवड केली जाईल आणि कायमस्वरूपी हलविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले बाजारात स्थलांतर केले जाईल.मात्र जेव्हा रहिवाशांनी स्पष्ट कालमर्यादा मागितली, तेव्हा अधिकाऱ्यांनी ती देण्यास नकार दिला. त्यामुळे नागरिकांनी एकमुखाने ठरविले आहे:

जर हा प्रश्न २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत निकाली न निघाला, तर रहिवासी सेनापती बापट मार्गावरील मासळी बाजाराबाहेर रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. या विलंबामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी थेट जबाबदारी ही मुंबई महापालिकेवर (MCGM) असेल. असे स्थानिक रहिवाशांनी आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध