Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५

मतांच्या हंगामात ‘जनसेवेची स्फूर्ती’!!



जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधूमाळी सुरू झाली आहे... आणि काय आश्चर्य! गेल्या काही वर्षांपासून ‘गाढ झोपेत’ असलेले माजी जि प, प स सदस्य अचानक ‘जनतेच्या सेवेत’ जागे झाले आहेत.

आता सगळीकडे उत्साह!! 
कोण फराळ वाटतोय, कोण उटणे, कोण पंती — तर काही जनतेच्या दारात ‘काळजीचा’ आव आणत फिरताना दिसत आहेत.
पाच वर्षे चेहऱ्यावरचं हसू हरवलेलं असतं, आणि निवडणुकीच्या काळातच त्यांना आठवतं की “जनतेशी नातं ठेवायला हवं!”

 अजूनही काही ठिकाणी खेडे गावातील जनता खड्ड्यांमधून प्रवास करत आहे.
पाण्याच्या टंचाईत, अंधारात, आणि भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीत जगत आहे.
तेव्हा हेच जि प आणि प स सदस्य कुठे होते?
काय ‘सेवा’ करत होते?
उत्तर गावकऱ्यांना ठाऊक आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य म्हणून मिळणाऱ्या निधीवर कोणी बंगले, गाळे, प्लाॅट्स, गाड्या कमावू शकतो का ?
जर हो, तर ही ‘जनसेवा’ नोबेल पुरस्कारासाठी पात्र आहे!
जिल्हा परिषदेची ठेकेदारी आणि गुप्त सल्ले — सगळं यांच्याच हातात.
गावा गावात अवैध धंद्यांना संरक्षण देणारे, की आणि पोलिस कारवाई झाली की “समजावणीसाठी” धावणारे हेच सज्जन लोक.

प्रश्न असा आहे —
आपण मतदार म्हणून अजून किती काळ या चमकदार पोस्टरांवर, बॅनरवर, आणि फराळावर फसत राहणार आहोत ?
पुन्हा त्याच चेहऱ्यांना निवडून देऊन आपल्यालाच खड्ड्यात ढकलायचं का ?

खेड्यात नव्या विचारांची, प्रामाणिक चेहऱ्यांची गरज आहे —
कारण जुन्या ‘सेवकां’नी खेड्यांचे जेवढं केलं, त्यापेक्षा नुकसानच अधिक केलं आहे.


म्हणून आता बदल करा 
पैशाच्या जीवावर निवडून येण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना निवडणुकीत उफटा करा.
दारू मटण वाटप करून तरुणांना व्यसनी बनवणाऱ्या राजकीय मंडळींना आवर घाला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध