Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
दूध गरम करताच झाले प्लास्टिक !! जम जम दूध डेअरीवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत..
दूध गरम करताच झाले प्लास्टिक !! जम जम दूध डेअरीवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत..
शिरपूर/ प्रतिनिधी ऐन दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी खरेदी केलेले दूध गरम करताच त्याचे अक्षरशः प्लास्टिक तयार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जनतेत खळबळ माजली आहे.दुधात भेसळ करण्याचे प्रकार वाढत असल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान,अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शिरपूर कुंभार टेक चोक येथील जम जम दूध डेअरी चालकावर नमुने तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल असे संकेत मिळाले आहेत.
शिरपूर शहरातील कुंभार टेक येथील जम जम या दूध डेअरी वाल्या कडे ना मशी ना मशीनचा तबेला तरी याठिकाणी दिवसभर ग्राहकांची दूध खरेदी करण्यासाठी गर्दी असते.दिवाळी सणासाठी दुधाची प्रचंड मागणी वाढल्याने सर्वत्र गर्दी होती.ग्रामीण भागातील करवंद येथील काही महिलांनी लक्ष्मी पूजनासाठी या डेअरी वरून पाच लिटर दुधाची खरेदी केली.त्यापैकी तिन लिटर दूध वापरण्यात आले.दोन लिटर दूध चांगले राहावे यासाठी फ्रिज मध्ये ठेवले.
दुसऱ्या दिवशी दूध गरम करण्यात आले.
त्यांनतर त्याचे रबर झाल्याचा अनुभव महिलांना आला.संपूर्ण दुधात प्लास्टिक दिसत होते.या प्रकाराने महिला चांगल्याच घाबरल्या.ही चर्चा कानोकानी पसरताच खळबळ उडाली.या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियात टाकताच त्याची सर्व दूर चर्चा झाली.काही वृत्त वाहिन्यांवर त्या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने तालुक्यात हा प्रकार पोहचला.अनेकांना त्याचा धक्का बसला.प्रामाणिक दूध विक्रेते यांना देखील त्यामुळे धक्का बसला आहे.
दूध भेसळ करून त्याची विक्री करण्याचे आणि त्यातून प्रचंड नफा जमविण्याचा काहींचा धंदा झाला आहे.त्यासाठी त्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.मात्र या भेसळ दुधामुळे लहान मुले,आजारी व्यक्ती,
वृद्ध यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
दूध घरात वापरले जाते.त्याचा फायदा घेत अनेक विक्रेत्यांनी त्यात घातक पदार्थ मिश्रण करून भेसळीचे दूध विकले जात आहे.दूध जास्त प्रमाणात विक्री करावे यासाठी युरिया,डिटर्जंट पावडर, लिटमस पेपर यांचा वापर केला जातो.मात्र त्याचे विपरीत परिणाम घरातील लोकांना भोगावे लागत आहेत.
या प्रकाराने अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग सक्रिय झाला आहे.त्यांनी जम जम दूध डेअरी याठिकाणी दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे.त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या विभागाने केवळ या प्रकारा पुरते मर्यादित न राहता शिरपूर शहरातील संपूर्ण दूध डेअरी व विक्रेते यांची कसून चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे सुमारास नरडाणा पोलिसांनी गस्तीदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेत ८८,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही ...
-
शिरपूर/ प्रतिनिधी ऐन दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी खरेदी केलेले दूध गरम करताच त्याचे अक्षरशः प्लास्टिक तयार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जनत...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा