Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५
Home
/
/
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची धडाकेबाज कारवाई जामन्यापाणीच्या वनक्षेत्रातून 2,050 किलो गांजा जप्त – 7 जणांना अटक
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची धडाकेबाज कारवाई जामन्यापाणीच्या वनक्षेत्रातून 2,050 किलो गांजा जप्त – 7 जणांना अटक
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील जामन्यापाणी परिसरात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक कृती विभाग आणि धुळे जिल्हा पोलीस दलाने संयुक्तरित्या मोठी कारवाई करत गांजाच्या अवैध लागवडीचा पर्दाफाश केला. दोन दिवस चाललेल्या या विशेष मोहिमेत मूल्य 1 कोटी 2 लाख 50 हजार रुपये इतका, एकूण 2,050 किलो गांजा जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुप्त बातमीच्या आधारे छापा
दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील यांना जामन्यापाणी गावाजवळील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गांजाची बेकायदेशीर लागवड सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार टास्क फोर्स व धुळे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला.
त्यावेळी वनजमिनीवर गांजा झाडांची लागवड, देखभाल व रखवाली करत असलेले खालील 7 आरोपी आढळून आले:
कालुसिंग गोंडा पावरा (35), बडवाणी, म.प्र
कृष्णा तारासिंग पावरा (25), शिरपूर
हरबा कुवरसिंग पावरा (27), बडवाणी, म.प्र
गोंडा नाना पावरा (55), बडवाणी, म.प्र
गुलाब हाण्या पावरा (55), शिरपूर
कांतीलाल गुलाब पावरा (26), शिरपूर
रमेश गुलाब पावरा (21), शिरपूर
दोन दिवसांत 2,050 किलो गांजा जप्त..!
अतिदुर्गम ठिकाण असल्याने कारवाई दोन टप्प्यांत करण्यात आली.
पहिल्या दिवशी : 1,050 किलो
दुसऱ्या दिवशी : 1,000 किलो
अशा प्रकारे एकूण 2,050 किलो गांजा (किंमत – ₹1,02,50,000/-) जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल – आरोपी पोलिस कस्टडीत
शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात NDPS कायदा 1985 चे कलम 8(b)(c), 20(c), 25 नुसार गुन्हा दाखल.
सातही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली.
ही कारवाई खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स :
विशेष पोलीस महानिरीक्षक – शारदा राऊत
पोलीस उपमहानिरीक्षक – प्रविण पाटील
पोलीस अधीक्षक – मकानदार
अपर पोलीस अधीक्षक – गणेश इंगळे
तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी
धुळे जिल्हा पोलीस दल :
पोलीस अधीक्षक – श्रीकांत धिवरे
अपर पोलीस अधीक्षक – अजय देवरे
उपविभागीय पोलीस अधिकारी – सुनिल गोसावी तसेच शिरपूर पोलिसांचे पथक ही कारवाई जामन्यापाणी परिसरातील गांजाच्या अवैध शेतीविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी धडक मानली जात आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा