Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५
बेटावदचे शुभमबाबा महाजन यांची सलग दुसऱ्यांदा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
धुळे जिल्ह्यातील उत्साहवर्धक राजकीय घडामोडीत मंत्री ना. जयकुमारभाऊ रावल साहेब यांचे निकटवर्तीय, शेतकरी पुत्र आणि युवा नेतृत्व म्हणून ओळख असणारे श्री. शुभमबाबा महाजन यांची भाजपा युवा मोर्चा धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सक्रिय कार्यतत्परतेला, संघटन बांधणीतील प्रभावी योगदानाला आणि युवकांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासाला मिळालेल्या या मानाच्या स्थानाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
युवा मोर्चाच्या जिल्हा स्तरावरील बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. संघटनेत सर्व स्तरांवर कार्यरत राहताना शुभमबाबा महाजन यांनी विविध सामाजिक उपक्रम, तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या यशासाठी सातत्याने मेहनत घेतली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जिल्ह्यातील पदाधिकारी व वरिष्ठ नेत्यांनी या नियुक्तीला एकमुखाने अनुमोदन दिले.
नियुक्तीनंतर श्री. महाजन यांनी विश्वास व्यक्त करून सांगितले की, “मंत्री जयकुमारभाऊ रावल साहेबांचे मार्गदर्शन आणि पक्षातील वरिष्ठांचे आशीर्वाद यामुळेच मला सलग दुसऱ्यांदा ही जबाबदारी मिळाली आहे. आगामी काळात युवा शक्तीला संघटित करून भाजपाच्या धोरणे व विकासकामे प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आहे.”
विविध सामाजिक,राजकीय व कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन संदेशाचा वर्षाव होत आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा