Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५
Home
/
/
नरडाणा पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी दारूनिर्मितीचा मोठा फोर्ड उधळला; ४६,७०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
नरडाणा पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी दारूनिर्मितीचा मोठा फोर्ड उधळला; ४६,७०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
नरडाणा प्रतिनिधी- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०२५ तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध हातभट्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नरडाणा पोलिसांनी जोरदार मोहिम राबवली असून दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी केलेल्या विशेष कारवाईत गावठी हातभट्टीचे जाळे उधळण्यात यश आले आहे.
होळ (ता. शिंदखेडा, जि. धुळे) परिसरातील धरणाकाठावर गावठी हातभट्टीची दारू तयार करून चोरटी विक्रीसाठी साठवणूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने छापा घालून नामदेव शामराव भिल (रा. होळ) याला शिताफीने ताब्यात घेतले.
छाप्यात पोलिसांनी हस्तगत केले—
▪ २४ प्लास्टिक ड्रम
▪ ८४० लिटर वॉश (₹४२,000)
▪ ३० लिटर हातभट्टी दारू (₹३,०००)
▪ निर्मितीसाठी लागणारे साहित्य (₹१,७००)
असा एकूण ₹४६,७०० किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
विशेष कारवाई पथकात एपीआय निलेश मोरे, पोउनि रविंद्र महाले, असई हेमंत पाटील, पोहेकॉ ललीत पाटील, रविंद्र मोराणीस, अनारसिंग पवार, योगेश गिते, भरत चव्हाण, पोना भुरा पाटील, पोकॉ अर्पण मोरे, सचिन बागुल, विजय माळी, विनोद कोळी तसेच ग्रेपोसई अजय सोनवणे यांचा सहभाग होता.
नरडाणा पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध हातभट्टी व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा