Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५
Home
/
/
प्रभाग क्रमांक १५ चा सर्वांगीण विकास हाच ध्यास!! बीजेपी उमेदवार "केतकी" राजेश भोई व "हर्षल" विजयसिंग गिरासे यांची ठाम ग्वाही
प्रभाग क्रमांक १५ चा सर्वांगीण विकास हाच ध्यास!! बीजेपी उमेदवार "केतकी" राजेश भोई व "हर्षल" विजयसिंग गिरासे यांची ठाम ग्वाही
शिरपूर प्रतिनिधी – आगामी नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ साठी भाजपच्या उमेदवार "केतकी" राजेश भोई व "हर्षल" विजयसिंग गिरासे यांनी विकास हा एकमेव अजेंडा ठेवत दमदार भूमिका मांडली आहे. “प्रभागातील प्रत्येक नागरिकाला सुविधा, स्वच्छता, रस्ते, निचरा व मूलभूत विकासाची सोय मिळाल्याशिवाय समाधान नाही. सत्ता आली तर कामच बोलू देऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
नागरिकांशी संवाद साधताना दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील प्रलंबित कामांच्या जलद निकालीसाठी ‘शून्य राजकारण—शंभर टक्के विकास’ हा मंत्र जाहीर केला. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, अंगणवाडी-सुविधा, प्रकाशव्यवस्था, अंतर्गत रस्ते व कचरा व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांत निर्णायक बदल घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मतदारसंघात सध्या प्रचाराचा जोर वाढत असून, प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजप उमेदवारांची विकासाभिमुख भूमिका चर्चेत आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा