Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत डॉ. परिक्षीत बाविस्कर यांना वाढता प्रतिसाद
अमळनेर शहरात निवडणुकीचे वातावरण तापू लागले असुन शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. माता-भगिणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर यांचे औक्षण करून स्वागत करीत असुन कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजर करून ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.’ ‘जय भवानी.. जय शिवाजी’ च्या घोषणा देऊन धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. विविध प्रभागात प्रचाराची सुरुवात झाली असुन माजी आमदार शिरीषदादा चौधरी हे देखील ‘धनुष्यबाण’ला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. प्रचार रॅली संपल्यानंतर डॉ परिक्षीत बाविस्कर मतदार बंधू भगिनींना मनोगतातुन सांगतात की आमच्या बाविस्कर व सोनवणे परिवाराने समाजसेवेचा वसा घेतला आहे आणि मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना मला देखील समाजसेवेची आवड निर्माण झाली व ती अविरत चालूच आहे. परंतु समाजसेवेच्या माध्यमातून अमळनेर शहराचा विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढायचा असल्याने मी शिवसेनेकडून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. कारण शिवसेनेत ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण केले जाते म्हणूनच माझी उमेदवारी धनुष्यबाण वर आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माझी उमेदवारी असुन शहरात आठ ते दहा दिवसा आड होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी, शहरातील विविध भागातील रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी व इंदौर शहराच्या धर्तीवर आपले अमळनेर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण धनुष्यबाणाला मतदान करा असे आवाहन शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉ. परिक्षीत बाविस्कर यांनी केले. सदर प्रसंगी शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल गंगाराम महाजन, उज्वला देविदास महाजन, अपूर्वा जालंधर चौधरी, सरिता भरत पवार, राजेंद्र श्याम यादव, माया कैलास लोहरे, सुयोग ज्ञानेश्वर धनगर, पुष्पा पंकज भाई, कैलास रामलाल भावसार, भाग्यश्री दीपक मराठे, कल्पना चंद्रकांत शर्मा, पंकज पंडित चौधरी, प्रवीण शशिकांत पाठक, ज्योती पंकज शेटे, नीता नरेश कांबळे, शेख नवीद, बहारे कृष्णा रामसिंग, शिंदे पूजा रमेश, सुनील चंद्रकांत भामरे, मनीषा दीपक पाटील, श्रीराम भगवान चौधरी, सय्यद मिसबाह मनाजीरली, गायत्री प्रविण पाटील, तर प्रचार फेरीत सुधीर चौधरी, शालिक पाटील, भाऊसाहेब पाटील, महेश जाधव, अमोल भावसार, विजेंद्र शिरसाळे, मनोज शिंगाणे, राहुल कंजर, ऋतिक भामरे, पंकज भावसार, संतोष पाटील, हरीश भावसार, मुकेश पाटील, गणेश चौधरी, पंकज भोई आदी उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा