Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५
अंधेरी एमआयडीसीमध्ये रासायनिक गळती; एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर!*
मुंबई :अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी परिसरातील भंगारवाडी येथे शनिवारी दुपारी रासायनिक गळतीची गंभीर घटना घडली. एक मजली गाळ्यामध्ये अचानक वायूगळती सुरु झाली आणि त्यात तिघांना श्वास गुदमरल्यामुळे त्रास होऊ लागला. तिघांना रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी ५ वाजता ही घटना घडली. रासायनिक गळती सुरु झाल्यामुळे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रासायनिक गळतीचा शोध सुरु असून कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाबरोबरच एनडीआरएफ दलालाही सतर्क ठेवण्यात आले आहे.
या दुर्घटनेत तीन जणांना वायुगळतीमुळे श्वासोच्छवास घेण्यास त्रास झाला. त्यांना तातडीने होली स्पिरिट रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयातून मिळालेली माहितीनुसार अहमद हुसेन (२०) याला रुग्णालयात आणल्यावर मृत घोषित करण्यात आले. तर नौशाद अन्सारी (२८) आणि सब़ा शेख (१७) या दोघांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
या प्रकरणी अग्निशमन दल पुढील तपास करीत असून शोधकार्य सुरू आहे. रासायनिक गळतीचा स्रोत आणि प्रकार शोधण्याचे काम सुरू असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा