शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यातील जामनेपाणी गावाच्या अतिदुर्गम वनक्षेत्रात अज्ञात व्यक्तींनी उभारलेल्या अवैध गांजा शेतीचा भंडाफोड करत पोलिसांनी तब्बल 1 कोटी 6 लाख 25 हजार रुपयांच्या अवैध कॅनाबिस वनस्पती जागेवरच नष्ट केल्या.
4 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळताच त्यांनी त्वरित NDPS कायद्याच्या कलम 52A अंतर्गत प्रक्रिया सुरू केली. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्याचे परवानगीपत्र मिळवण्यात आले.
40 हजार स्क्वेअर फूटात उभा ‘हरित गुन्हा’
विशेष पथकाने छापा मारताच कंपार्टमेंट क्र. 1020 (नियत क्षेत्र भोरखेडा) येथे 40 आर म्हणजे जवळपास 40,000 स्क्वे.फुट भूभागात पसरलेली अवैध कॅनाबिस शेती आढळून आली.
यातील वनस्पतींची बाजारभावानुसार किंमत 42,45,000 रुपये इतकी निघाली.
कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.
पोलिस कारवाईच्या भीतीने 82 गुंठ्यातील गांजा आधीच कापला
छाप्यावेळी कंपार्टमेंट 1041 (37 गुंठे) व 1042 (45 गुंठे) अशा एकूण 82 गुंठ्यांतील गांजा अज्ञातांमार्फत आधीच कापून टाकलेला असल्याचे दिसून आले.
या कापलेल्या गांजाचे वजन 1276 किलो व किंमत 63,80,000 रुपये एवढी निघाली. हा मुद्देमालही नियमानुसार जाळून नष्ट करण्यात आला.
एकूण 2125 किलो गांजा – 122 गुंठे क्षेत्र – 1 कोटी 6 लाखांचा माल खाक
संपूर्ण कारवाईत वनक्षेत्रातील 1,22,000 स्क्वेअरफुट क्षेत्रातून 2125 किलो गांजा नष्ट करण्यात आला.
एकूण मूल्य 1,06,25,000/- रुपये एवढी नोंद करण्यात आली.
याबाबत पोहेकॉ सागर ठाकूर यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध NDPS कलम 8(क), 20(ब)II(क), 22(क) नुसार फिर्याद दिली असून तपासाची धुरा पोसई सुनील वसावे सांभाळत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक मोहीम खालील अधिकाऱ्यांच्या आदेशाने पार पडली—
- मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे
- अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक
- सुनील गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर
कारवाईत प्रमुखपणे सहभागी : PI जयपाल हिरे, पोसई सुनील वसावे, पोहेकॉ सागर ठाकूर, संतोष पाटील, चत्तरसिंग खसावद, विजय ढिवरे, स्वप्निल बांगर, मनोज नेरकर, जयेश मोरे, भुषण पाटील, प्रकाश भिल, सुनिल पवार, रोहिदास पावरा, पाला पुरोहित, भगवान गायकवाड, ग्यानसिंग पावरा, मुकेश पावरा, अल्ताफ मिर्झा, ईसरार फारुकी आदींचा समावेश.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा