Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६
अमळनेर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर प्रतिनिधी
▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका
परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. ६) रात्री उघडकीस आली. याबाबत असे, सागर राजाराम पाटील (वय २९, रा. शिरुड नाका, दुर्गा हॉस्पिटलजवळ, अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आई सुनंदा राजाराम पाटील व भाऊ दीपक राजाराम पाटील यांच्यासह राहत होता. वडील राजाराम अर्जुन पाटील यांचे पूर्वीच निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास सागर पाटील याने राहत्या घरातील स्लॅबच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा