Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

एका भिक मागणाऱ्या महिलेवर अत्याचार



▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आकिबखान गफ्फारखान रा. कसाली मोहल्ला मशीदजवळ असे आरोपीचे नाव आहे. मध्यप्रदेशातील मागासवर्गीय २४ वर्षाची परित्यक्ता महिला रेल्वेत भीक मागते. तिची अमळनेर येथील आकिबखान गफ्फारखान याच्याशी इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली. त्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटत होते. प्रत्येकवेळी आकीबखान तिला जेवण व पैसे देत होता.

कसाली मोहल्ल्यातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल बऱ्हाणपूरहुन रेल्वेत आली


६ रोजी सकाळी ११:३० वाजता ती महिला असता आकीबने तिला उतरवून घेतले व तिच्यासोबत गप्पा झाल्यानन्तर तिला मोटारसायकल एम एच १९, डी जे २९५५ हिच्यावर सोबत समीर नावाचा मित्र असे तीन सीट धार येथील पिर बाबांच्या दर्याकडे घेऊन गेला. दर्याच्या खालच्या बाजूला गाडरस्त्यावर एका पत्र्याच्या झोपडीत त्याने बियर पिऊन महिला सोबत शरीर सुखाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर त्याने मारहाण करून बळजबरीने पत्र्याच्या शेडमध्ये नेवुन अत्याचार केला. त्यानंतर महिलेला परत स्टेशनवर आणून सोडले. महिलेने अमळनेर पोलिसांशी संपर्क साधून घटनास्थळी नेले. घटनास्थळी मारवड पो स्टे अंतर्गत येत असल्याने महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलिस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ३५१(२),३२४(४), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम३ (१) (डब्ल्यू) (१), (२), ३(२),३ (५) प्रमाणे अत्याचार व ऍट्रोसिटीचा गुन्हा - दाखल केला. तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध