Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

शिरपूरच्या पाणी व्यवस्थापनाचा आढावा : पाणीपुरवठा सभापती मा.गणेशभाऊ सावळे यांची पाणी फिल्टरेशन प्लांटला भेट



शिरपूर तालुक्यात राबविण्यात आलेल्या विकासात्मक उपक्रमांमुळे पाणी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात “शिरपूर पॅटर्न” हा देशभरात आदर्श मानला जातो. शिरपूर तालुक्यातील विकासात्मक कार्याचे तेजमय सूर्य सन्माननीय भाईसाहेब अमरीशजी पटेल यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून विकसित झालेल्या या नियोजनबद्ध आणि शाश्वत पाणी व्यवस्थापन पद्धतीची अंमलबजावणी आजही विविध स्तरांवर सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर, सन्माननीय भुपेशभाई पटेल व लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय चिंतनभाई पटेल यांच्या आश्वासक नेतृत्वाखाली कार्यरत शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती मा. गणेशभाऊ सावळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह शिरपूर येथील पाणी फिल्टरेशन प्लांटला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पाणीपुरवठा व्यवस्थापनाशी संबंधित अभियंते व कर्मचाऱ्यांकडून पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली.

यासोबतच करवंद जॅकवेल येथेही भेट देऊन पाणी उपसा व वितरण व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा त्यांनी घेतला. पाण्याची निर्जंतुकता, शुद्धता आणि सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची पाहणी करून अधिकाऱ्यांना काही सूचनाही त्यांनी दिल्या.

शिरपूर शहरात २४ तास शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आखलेल्या नियोजनाची माहिती घेताना व्यवस्थेतील कार्यपद्धती, देखभाल आणि नियंत्रण यंत्रणा देखील जाणून घेतली. शाश्वत व उत्कृष्ट पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने पुढील काळातही समन्वयाने काम करण्यावर भर देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध