Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

चिमठाणे बस स्थानकात शेवाळे येथील वयोवृद्ध महिलेच्या दोन्ही पायावरून एस.टी बस चे पुढचे चाक गेल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू परिसरात हळहळ .....



प्रतिनिधी -प्रविण भोई...
चिमठाणे बस्थानकत गुरुवार सकाळी 11:20 च्या सुमारास दुर्दैवी घटना घडली धुळ्याकडून नंदुरबार कडे जाणारी इलेक्ट्रिक बस क्रमांक एम.एच ४९ बी झेड ८२६८ चिमठाणे बसस्थानकातून नंदुरबार कडे प्रस्थान करताना वृद्ध महिलेच्या बसच्या पुढच्या चाकात वृद्धेचे दोघी पायांवर बस चे चाक गेल्याने त्यात सदर वृद्ध महिला.राहणार शेवाळे लीलाबाई तुळशीराम सोनार यात गंभीर जखमी झाल्या होत्या.सदर महिलेस तात्काळ रुग्णवाहिके प्राथमिक उपचारासाठी चिमठाणे प्राथमिक रुग्णालयात हलविण्यात आले.नंतर तातडीने धुळे येथे रुग्णलयात नेण्यात आले. मात्र अती रक्तस्रावामुळे रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमठाणे बसस्थानकात अशी दुर्दैवी घटना घडल्याने तेथे जमलेल्या लोकांचे मन हेलून जात होते.घडलेल्या अपघाताचे घटनेचे दृश्य एवढे भयंकर होते की काही लोकांना बघणे शक्य नव्हते...सदर घटनास्थळी पोलीस पंचनामा केला असून.संबंधित बसला चौकशी साठी ताब्यात घेण्यात आली आहे. 

अपघात नेमका चालकाच्या निष्काळजी पणा मुळे घडला का? बस स्थानकाच्या सोई सुविधाच्या अभावामुळे? नियोजनाच्या आभावामुळे?कारण बस गाड्यांचे कुठलेच नियोजन नाही. येणाऱ्या बस कोणत्या स्थानी थांबतील धुळे कडून येणाऱ्या बस दोंडाईचा कडून येणाऱ्या जाणाऱ्या बस यांचे योग्य नियोजन नाही.किंवा कुठल्याच बसेसचे नियोजित जागा नाही. की या ठिकाणी प्रवाशी उतर चड करू शकतील. सीसीटीव्ही कॅमेरे देखील बस स्थानकात बसवलेले नाहीत.सदर घटनेने शेवाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी होत आहे..व भविष्यात अशी घटना घडू नये या साठी एसटी महामंडळने योग्य ती पाऊले उचलणे महत्वाचे आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध