Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ मार्च, २०२६

शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई: ३७ लाखांचा गांजा व अफू जप्त; सर्व आरोपी जेरबंद



शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. पळासनेर शिवारातील हॉटेल आणि धाब्यांवर छापा टाकून पोलिसांनी ३७ लाख ४५ हजार ९६५ रुपये किमतीचा २२४.६९९ किलो गांजा आणि अफूचा साठा जप्त केला असून, या मोहिमेत सहभागी असलेल्या संपूर्ण पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

गुप्त माहितीवरून टाकले छापे

दिनांक १८/०३/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, पळासनेर गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर असलेल्या हॉटेल/धाब्यांवर भला चारण/भरवाड, लखा चारण/भरवाड हे गांजा व डोडा या अमली पदार्थांची विक्री करत आहेत. या माहितीची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने चार पथके तयार करून एकाच वेळी 'हॉटेल जय बाबारी', 'जय मातादी ढाबा' आणि 'हॉटेल रामदेव बाबा' येथे छापेमारी करण्यात आली.

जप्त मुद्देमाल आणि आरोपी

या कारवाईत पोलिसांनी भला सोडा भरवाड, गोपाळ रघु भरवाड आणि लाला गांगू भरवाड (सर्व रा. चारणपाडा, पळासनेर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गांजाचा चुरा, सुकलेला गांजा, अफूची पावडर (डोडा) आणि अफूच्या सुकलेल्या बोंडांचे तुकडे असा एकूण २२४.६९९ किग्रॅ वजनाचा माल जप्त केला.

या पोलीस पथकाने केली कामगिरी

ही मोठी कारवाई यशस्वी करण्यासाठी खालील अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने परिश्रम घेतले:
मार्गदर्शक अधिकारी:
श्री. श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, धुळे)
श्री. अजय देवरे (अपर पोलीस अधीक्षक, धुळे)
श्री. सुनील गोसावी (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर विभाग)
प्रत्यक्ष कारवाईतील पथक:
१. जयपाल हिरे (पोलीस निरीक्षक, शिरपूर तालुका पो.स्टे.)
२. सुनील वसावे (पोलीस उपनिरीक्षक)
३. मनोज कचरे (पोलीस उपनिरीक्षक)
४. मिलिंद पवार (पोलीस उपनिरीक्षक)
५. शेखर बागुल (पो.हॅ.कॉ. १६२८ - फिर्यादी)
६. राजु डिसले (पो.हॅ.कॉ. ११)
७. संतोष पाटील (पो.हॅ.कॉ. ८४)
८. संदीप ठाकरे (पो.हॅ.कॉ. ७४५)
९. सुनील पाठक (पो.हॅ.कॉ. ९१७)
१०. अनिल चौधरी (पो.कॉ. ३१७)
११. कृष्णा पावरा (पो.कॉ. १४६४)
१२. दिनकर पवार (पो.कॉ. ४८४)
१३. योगेश मोरे (पो.कॉ. १६७७)
१४. स्वप्निल बांगर (पो.कॉ. १५६२)
१५. विजय डिवरे (पो.कॉ. ९२२)
१६. बडगुजर (पो.कॉ. १७२१)
१७. शिवाजी वसावे (पो.कॉ. १४८६)
१८. जयेश मोरे (पो.कॉ. ६८५)
१९. अल्ताफ मिर्झा (चा.पो.हॅ.कॉ. ५१४)
२०. फारुकी (चा.पो.कॉ. १७)

पुढील तपास

शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.रं.नं. १०३/२०२६ नुसार NDPS ॲक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे हे करत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध