Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ मार्च, २०२६
Home
/
/
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'दीक्षांत समारंभ' उत्साहात संपन्न; चिमुकल्यांचा नव्या शैक्षणिक जगात प्रवेश
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'दीक्षांत समारंभ' उत्साहात संपन्न; चिमुकल्यांचा नव्या शैक्षणिक जगात प्रवेश
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी येथील प्रतिष्ठित गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये नर्सरी, ज्युनिअर आणि सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा 'ग्रॅज्युएशन डे' म्हणजेच दीक्षांत समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.निकाल आणि पुढच्या वर्गात प्रवेशाचा हा दिवस चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि पालकांमध्ये अभिमान घेऊन आला.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून दिंडोरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल सौ.वैशाली खराटे ह्या उपस्थित होत्या.विशेष म्हणजे,त्या शाळेच्या पालक देखील आहेत.याशिवाय शाळेचे संस्थापक अध्यक्ष अमोल देशमु व संचालक प्रा.सोमनाथ सोनवणे संचालिका सौ.तेजल देशमुख सौ.मेघा सोनवणे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर 'सर्वांगीण' शिक्षणावर भर देणे हे विद्यालयाचे महत्त्वाचे तत्त्व आहे.
कार्यक्रमादरम्यान पालकांनी आपल्या पाल्यांची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले."गुरुकुलमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान दिले जात नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ,डान्स,कॉम्प्युटर, म्युझिक,जनरल नॉलेज आणि लॉजिकल रिझनिंग यांसारख्या विषयांचे स्वतंत्र प्रशिक्षित शिक्षकांद्वारे अध्यापन केले जाते ओलंपियाड सारख्या परीक्षा इंग्रजी गणित व विज्ञान सारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी घेतल्या जातात.अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया काही पालकांनी यावेळी दिल्या.भविष्यातील तंत्रज्ञानाची पूर्वतयारी करत पुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुरुकुलमध्ये आधुनिक काळाची गरज ओळखून खालील प्रगत विषय शिकवले जातात.यामध्ये AR - VR (ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी)
3D अॅनिमेशन आणि मॉडेलिंग
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि रोबोटिक्स फायनान्शियल लिटरसी आणि प्रोग्रामिंग
NEET आणि JEE साठी अॅलन इन्स्टिट्यूटसोबत करार ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे,यासाठी गुरुकुलने प्रसिद्ध 'अॅलन इन्स्टिट्यूट' (Allen Institute) सोबत टाय-अप केले आहे.याद्वारे इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना नीट (NEET) आणि जेईई (JEE) परीक्षेचे दर्जेदार मार्गदर्शन शाळेतच उपलब्ध करून देण्यात आले आहे."विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आणि त्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
शाळेतील सर्व शिक्षक एक संघ म्हणून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि संस्कारपूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध आहोत." पुढील वर्षीच्या प्रवेशासाठी प्रसंगी पालकांना आवाहन करण्यात आले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा