Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

पालखेड बंधारा येथे ज्ञानाच्या अथांग महासागरास अभिवादन.




बापू चव्हाण दिंडोरी

    दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जि.प.प्राथमीक शाळेत व ग्रामपंचायत येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनस्वी पगार ही होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच बबलू गायकवाड बापू (तात्या) चव्हाण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामनाथ पिठे उपाध्यक्ष लहानू वाघ सदस्य धनराज महाले,अन्वर सैय्यद,संदिप पिठे,मुख्याध्यापक प्रवीण खैरनार यांच्या हस्ते प्रतिमा पूजा व पुष्पहार अर्पण करण्यात आला.तर ग्रामपंचायतमध्ये ही सरपंच रेखा गांगुर्डे उपसरपंच बबलू ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल भवर, धनश्री गायकवाड, रंजना कडाळे, ग्रामअधिकारी प्रकाश बागुल सामाजिक कार्यकर्ते मोहन गांगुर्डे आरोग्य सेवक संदीप गायकवाड साहेबराव गोतरणे,भारत गोतरणे, निलेश सोळशे,गोविंद ढेपले,संजय सोनवणे,प्रशांत विसपुते यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
         यावेळी जी.प.प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भाषणे सादर केले.इयत्ता तिसरी पाचवीतील विद्यार्थ्यांनी यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी गायन व नृत्य सादर केले.शाळेचे शिक्षक प्रशांत उन्हवणे यांनी आपल्या मनोगत आंबेडकरांच्या जीवनातील प्रसंग सांगितला.तर अमोल पवार यांनी आंबेडकरांचे शिक्षण विषय विचार आणि महत्व सांगितले.बापू (तात्या) चव्हाण यांनी शिक्षण घेऊन उंच भरारी घ्या असे प्रतिपादन केले. यावेळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशांत उन्हवणे यांनी व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमोल पवार यांनी केले तर आभार दिलीप झुरडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध