Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

दिंडोरीत काँग्रेसचे 'सृजन संघटन अभियान' उत्साहात संपन्न.



बापू चव्हाण दिंडोरी

    दिंडोरी तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने 'सृजन संघटन अभियान' उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करून इंदोरे परमोरी येथील युवकांच्या अकस्मात निधनाबद्दल तसेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रमेश कहांडोळे होते.प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस नेत्या शमीना शफिक,माजी मंत्री पद्माकर वळवी,जिल्हा प्रभारी संदीप पाटील, राजाराम पानगव्हाणे,ज्ञानेश्वर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक करताना जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष वाळू पाटील जगताप यांनी अभियानाची भूमिका स्पष्ट केली.माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सृजन संघटन अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.जिल्हा प्रभारी संदीप पाटील यांनी जिल्हा व तालुका स्तरावरील संघटनात्मक निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन केले.तसेच आगामी काळात तरुणांना प्राधान्य देत जबाबदाऱ्या दिल्या जातील,असे त्यांनी सांगितले.इच्छुक उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.संघटनात्मक निवडणुका पारदर्शकपणे पार पाडून काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. 
      राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,विरोधी पक्षनेते राहुल गांधी व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच महिलांवरील अत्याचार व भोंदू बाबांच्या वाढत्या घटनांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
    यावेळी तालुका काँग्रेसच्यावतीने सुनील आव्हाड,दिलीप शिंदे,नामदेव राऊत,मोहन महाले,कचरू गांगुर्डे, दशरथ महाले आदींनी मनोगत व्यक्त केले.प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी पेट्रोल,डिझेल व गॅस टंचाई,कांदा हमीभाव,महिला अत्याचार या मुद्द्यांवर राज्य सरकारवर तीव्र टीका केली.निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
      कार्यक्रमास पंडितराव गायकवाड,ललिता खांडवी,शिवाजी पागे,सुवर्णा वरगडे,दशरथ कराटे, धनाजी खांदवे,प्रकाश धात्रक शिवाजी बोराडे,शांताराम खांदवे गोरख खांदवे,रामराव गुंड,मंगला उघडे,जयराम गवळी,गोविंद ढाकणे,श्याम परदेशी,रामनाथ शिरसागर यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.नारायण पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध