Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १५ एप्रिल, २०२६
Home
/
/
मालेगाव शहरात चैन स्नॅचिंग करणारा आंतरराज्यातील सराईत गुन्हेगार जेरबंद चैन स्नॅचिंगचे १० गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास यश.
मालेगाव शहरात चैन स्नॅचिंग करणारा आंतरराज्यातील सराईत गुन्हेगार जेरबंद चैन स्नॅचिंगचे १० गुन्हे उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास यश.
संदीप अवधूत :-
मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत दि. ०१/०३/२०२६ रोजी दुपारचे सुमारास सटाणा नाका परिसरात एका महिलेच्या गळयातील तीन तोळे सोन्याचे धातुची पोत कोणीतरी अज्ञात चोरटयांनी मोटर सायकलवर भरधाव वेगाने येवुन, हिसकावुन चोरून नेली म्हणुन मालेगाव छावणी पोलीस ठाणेस गुरनं ५५/२०२६ भान्यासं, कलम ३०४(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदर घटनेप्रमाणेच गेल्या काही महिन्यांमध्ये मालेगाव शहरातील वर्दळीची ठिकाणे तसेच मुख्य रस्त्यांवर पाळत ठेवुन महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने जबरीने चोरी केल्याच्या घटना घडलेल्या होत्या. त्याअनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील व अपर पोली अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी चैन स्नॅचिंगचे गुन्हयांचा आढावा घेवून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्ह शाखा व पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थागुशाचे पथक व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांचे पथकातील अंमलदार यांनी मालेगाव शहरात येण्या-जाण्याचे सर्व रस्ते तसेच चैन स्नॅचिंगचे गुन्हयांचे घटनास्थळांवरील उपलब्ध असलेले सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी तसेच तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून, आरोपीतांनी गुन्हयात वापरलेल्या मोटर सायकल बाबत गोपनीय माहिती घेवुन मिळविलेल्या गुप्त माहितीच्या आधारे यातील आरोपी हे कर्नाटक राज्यातील बिदर शहरात सध्या वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथकांनी कनार्टक राज्यातील बिदर शहरात गांधीगंज हद्दतील इराणी मोहल्ल्यामध्ये सतत ०५ दिवस पाळत ठेवून स्थानिक पोलीसांचे मदतीने खालील आरोपीस शिताफिने ताब्यात घेतले. ते खालीलप्रमाणे १) मुस्तफा अली इसा अली, वय २०, रा. भुसावळ, खडका रोड, इराणी मोहल्ला, जि. जळगाव, हल्ली रा. इराणी
मोहल्ला, बिदर, ता.जि. बिदर, राज्य कर्नाटक वरील आरोपी नामे मुस्तफा अली यास वरील चैन स्नॅचिंगचे गुन्हयांबाबत विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता, त्यांने व त्याचे साथीदार नामे २) सादिक अली इबादत अली, रा. भुसावळ, जि. जळगाव, ३) भोला सज्जाद अली, रा. भापोळ, राज्य मध्यप्रदेश, ४) अब्बास अली इबादत अली, रा. भुसावळ, जि. जळगाव, ५) मुस्लिम पुर्ण नाव माहिती नाही, रा. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर यांचेसह मालेगाव शहरात मागील काही महिन्यांमध्ये वेळोवेळी येवून मोटर सायकल भरधाव वेगाने चालवून महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावुन चोरी केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेला वरील आरोपी क. १ मुस्तफा अली याने कबुली दिल्यावरून मालेगाव शहर हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले चैन स्नॅचिंगचे एकुण १० गुन्हे उघडकीस आणण्यास ग्रामीण पोलीसांना आहे.१) मालेगाव छावणी पो.स्टे. गुरनं ५५/२०२६ भा. न्या. सं. कलम ३०४ (२), ३(५).२) मालेगाव छावणी पो.स्टे. गुरनं ६२/२०२६ भा. न्या.सं. कलम ३०४(२), ३(५).३) मालेगाव छावणी पो.स्टे. गुरनं १६०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५).
४) मालेगाव छावणी पो.स्टे. गुरनं ४४/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३(५).
५) मालेगाव छावणी पो.स्टे. गुरनं ४५/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३(५).
६) मालेगाव छावणी पो.स्टे. गुरनं १८५/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३(५).
७) मालेगाव कॅम्प पो.स्टे. गुरनं २११/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०४(२), ३(५).
८) मालेगाव कॅम्प पो.स्टे. गुरनं २२८/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०४ (२), ३(५).
९) मालेगाव कॅम्प पो.स्टे. गुरनं ३८/२०२६ भा. न्या.सं. कलम ३०४(२), ३(५).,१०) येवला तालुका पो.स्टे. गुरनं ५४/२०२६ भा. न्या. सं. कलम ३०४ (२), ३(५).,यातील सर्व आरोपी हे चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार असुन ते महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यात विविध गुन्हयांमध्ये फरार आहेत. सदर आरोपीतांनी मालेगाव शहरात गुन्हा करतेवेळी रॉयल एनफिल्ड कंपनीची हन्टर व बजाज कंपनीची पल्सर एन.एस. अशा मोटर सायकल वापरलेल्या असलेबाबत उघडकीस आले आहे. यातील ताब्यात घेतलेला आरोपी मुस्तफा अली याचे इतर साथीदारांचा पोलीस पथक कसोटीने शोध घेत असून त्यांचेकडून चैन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपीस छावणी पोलीस ठाणेकडील वरील नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालु आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प विभाग . सिध्दार्थ बारवाल, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभागी दर्शन दुगड यांचे मार्गदर्शन सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोउनि दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार शाम पवार, शरद मोगल, विशाल गोसावी, सचिन वराडे, नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी, संदिप राठोड, तसेच अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांचे गुन्हे शोध पथकातील अंमलदार दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, राकेश जाधव, राम निसाळ तांत्रिक विभागाचे पोहवा हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने वरील प्रमाणे चैन स्नॅचिंगचे १० गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प विभाग सिध्दार्थ बारवाल, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभागी दर्शन दुगड यांचे मार्गदर्शन सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोउनि दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार शाम पवार, शरद मोगल, विशाल गोसावी, सचिन वराडे, नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी, संदिप राठोड, तसेच अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांचे गुन्हे शोध पथकातील अंमलदार दिनेश शेरावते, सचिन बेदाडे, राकेश जाधव, राम निसाळ तांत्रिक विभागाचे पोहवा हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने वरील प्रमाणे चैन स्नॅचिंगचे १० गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा