Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२६
कॅम्प पोलीस स्टेशन मालेगाव येथे सायबर गुन्हे जनजागृती कक्षाची स्थापना.
दि.१५/०४/२०२६ कॅम्प पोलीस स्टेशन मालेगाव येथे दर्शन दुगड, सहा. पोलीस अधिक्षक कॅम्प उपविभाग मालेगाव यांचे संकल्पनेतुन दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, बाळासाहेब पाटील, पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण, तेगबीर सिंह संधु, अपर पोलीस अधिक्षक मालेगाव यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीस, कॅम्प पोलीस स्टेशन मालेगाव अंतर्गत सायबर गुन्हे जनजागृती कक्षाचे तेगबीर सिंह संधु, अपर पोलीस अधिक्षक मालेगाव यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.सायबर गुन्हे जनजागृती कक्षात एकावेळी ५० व्यक्ती बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. जनजागृती कक्षाचा उद्देश हा सध्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे घडत असल्याने लोकांमध्ये जनजागृती होवुन सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी आहे. कार्यक्रमाची सुरुवात हि शालेय विद्यार्थ्यांपासुन करण्यात आली असुन कार्यक्रमास अभिनव सांस्कृतिक मंडळ संचलीत आदर्श विद्यालय मालेगाव कडील चेतन राजपुत शिक्षक, भाग्यश्री बोरसे शिक्षिका यांचेसह २७ विद्यार्थी, २३ विद्यार्थीनी असे एकुण ५० विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्प पोलीस स्टेशन मालेगाव कडील सपोनि पंकज निकम, मपोउपनिरी विजया पवार यांनी सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी काय काळजी घ्यावी व सायबर फसवणुक झाल्यास काय उपाययोजना करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. यापुढे जनजागृती कक्षात आपण सायबर गुन्ह्यांपासुन कसे वाचु शकतो याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात पोहवा. रुपचंद पारधी, राजपुत, अहिरे, माळी, पो.शि. लखन पवार, पो.शि.शेख, मपोशि. सोनवणे यांनी सहभाग घेतला होता.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा