Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ एप्रिल, २०२६
त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लुट करणारे दोन भामट्यांवर गुन्हा दाखल.
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी :-
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिरात जगभारातून भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराचे अधिकृत नियमानुसार दर्शनासाठी २०० रूपये प्रमाणे देणगी दर्शन पास सुविधा सुरू आहे. सलग सुट्ट्या असल्या की, त्रंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठया प्रमाणावर गर्दी पहायला मिळते, गर्दी असल्यावर भाविकांना रांगेमध्ये राहुनच दर्शन करावे लागते, रांगेत उभे राहण्याऐवजी पैसे देवुन लगेच दर्शन करून देण्याचे अमिष दाखविणा-या इसमाविरूध्द मा. प्रधान सत्र न्यायाधीश नाशिक यांचेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे त्रंबकेश्वर पोलीसांनी दर्शनासाठी भाविकांची फसवणूक करणारे दोन भामट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.दि. ११/०४/२०२६ रोजी नाशिक शहरातील पंचवटी येथील दोन भाविक दर्शनासाठी श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर येथे २०० रूपये दराचे देणगी दर्शन पास घेवुन, दर्शन रांगेत उभे असतांना एका संशयीत इसमाने त्यांना भेटून मी तुम्हाला १० मिनिटात दर्शन करून देतो, तुम्ही घेतलेले पास दर्शनाकरीता चार ते पाच तास वेळ लागेल, मी तुम्हाला ३०००/- रूपये मध्ये व्ही.आय.पी. दर्शन करून देतो असे सांगुन, सदर संशयीताने त्याचे साथीदारासह यातील भाविकांना मंदिराचे आत प्रवेश देवुन दर्शन करून मंदिराचे बाहेर येताच त्यांचेकडून व्ही. आय.पी. दर्शनाचे ३०००/-रू. रोख स्वरूपात घेवून त्रंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे कोणतीही अधिकृत फि आकारण्याबाबत कुठलीही सुविधा नसतांना, तसेच त्याबाबत भाविकांना कोणतीही रिसिट न देता त्यांची फसवणुक केली म्हणून संशयीत इसम नामे १) गोटीराम मनाजी पेहरे, वय ४१, रा. खडकवाडी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक व २) अभिषेक कडलग, रा. त्र्यंबकेश्वर (फरार) यांचेविरूध्द त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणेस गुरनं ५२/२०२६ भा. न्या. सं. कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी क्रं . १ यास वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून सदर प्रकरणी पुढील तपास त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनानुसार सपोनि राजेश गावीत हे करीत आहे.श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविकांना आवाहन करण्यात येते की, व्हीआयपी दर्शनासाठी कोणीही इसम जास्त पैसे घेवुन दर्शन करून देतो असे सांगुन अमिष दाखवत असेल तर लागलीच त्रंबकेश्वर पोलीस ठाणे अथवा त्रंबकेश्वर मंदिर ट्रस्ट यांचेशी संपर्क करावा. कोणीही भाविकांनी प्रलोभनास बळी पडू नये असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.सदर प्रकरणी मा. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. रोकडे व श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. धुले तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे मार्गदर्शनानुसार त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सपोनि राजेश गावीत, पोहवा सचिन जाधव, पोकों सचिन गांगुर्डे, श्रावण साळवे, अमोल बोराडे, नंदु मुसळे, चालक अंकुश भोईर यांचे पथकाने सदरची कारवाई केली
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक जोपूळ येथील प्राथमिक शाळेची वाटचाल प्रगतीपथावर असून शाळेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे गौरवोद्गार अ...
-
माधव खाबिया :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये कारवाई करण्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा