Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ एप्रिल, २०२६
पिंपळगाव बसवंत शहरातील अवैध जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा.
माधव खाबिया :-
नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे.
त्यानुसार दि. ११/०४/२०२६ रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी पिंपळगाव बसवंत शहरातील जोपुळ रोड येथील बेंद मळा परिसरात एका बंदीस्त घरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली आहे. सदर छापा कारवाईत खालील इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.१) प्रशांत दत्तात्रय गांगुर्डे, रा. आझादनगर, पिंपळगाव बसवंत, २) सुजित सुभाष मोरे, रा. पिंपळगाव बसवंत, ३) उत्तम मधुकर धुमाळ, रा. दावचवाडी, पिंपळगाव बसवंत, ४) श्रीकांत सदाशिव मोरे, रा. रानमळा, पिंपळगाव बसवंत, ५) संदिप किसनराव घुले, रा. नारायणटेंभी रोड, पिंपळगाव बसवंत, ६) सागर दत्तात्रय खापरे, रा. नारायणटेंभी रोड, पिंपळगाव बसवंत, ७) उदय सुरेश खैरणार, रा. साईनगर, पिंपळगाव बसवंत, ८) धनंजय नरेंद्र धामणे, रा. दगुनाना मोरे नगर, पिंपळगाव बसवंत, ९) किरण रामदास मगर, रा. भिडेनगर, पिंपळगाव बसवंत, १०) सागर माधवराव पोटे, रा. शास्त्रीनगर, पिंपळगाव बसवंत, ११) संदिप दामोधर वाळुंज, रा. पोटे कॉलनी, पिंपळगाव बसवंत, १२) अनिल रावसाहेब घुमरे, रा. उंबरखेड रोड, पिंपळगाव ब. १३) सागर संजय कदम, रा. दगुनाना मोरे नगर, पिंपळगाव बसवंत, १४) स्नेहल विश्वासराव पाटील, रा. जउळके वणी, ता. दिंडोरी अशा एकुण १४ इसमांना ताब्यात घेण्यात आले.वरील नमुद इसम हे विनापरवाना बेकायदेशीररित्या बंदीस्त घरात जुगाराचा अड्डा चालवुन ५२ पानी पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळुन आले असून त्यांचे कब्जातुन जुगाराचे साहित्य साधने व रोख रक्कम असा एकुण ९,६९,३२०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमांविरूध्द पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यास गुरनं ८५/२०२६ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सपोनि नितीन रणदिवे, पोउनि शैलेश पाटील, पोउनि रविंद्र शिलावटे , पोहवा जालिंदर खराटे, सुशांत मरकड, मनोज बोराळे, सचिन पिंगळ यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक जोपूळ येथील प्राथमिक शाळेची वाटचाल प्रगतीपथावर असून शाळेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे गौरवोद्गार अ...
-
माधव खाबिया :- नाशिक ग्रामीण जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशान्वये कारवाई करण्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा