Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ एप्रिल, २०२६

पूरस्कार वितरण कार्यक्रमात संदिपभाऊ गवई यांचा हल्लाबोल.... षडयंत्राणे चळवळीच्या कार्यकर्त्याला संपवू नका... तथागत ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर सन्मानित.


मेहकर प्रतिनिधी :-

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयमध्ये तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर व जीवन दीप अनाथ आश्रम व वृध्दाश्रम तसेच राजमता माँ जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सातव्या वर्धापन व महात्मा जोतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सन्मान सोहळा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुरुष व महिलांचा सन्मान करण्यात आला. तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कुणाल माने, संदीप राऊत यांनी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई दिलीप खरात हे होते. यावेळी उपरोक्त प्रतिपादन करताना ते पुढे म्हणाले की, आज संपुर्ण महाराष्ट्रात दूषित वातावरण निर्मान झाले आहे.नव युवकांना पुढार देउन त्यांना बळ द्यावे. राजकारण करून त्यांना संपु नये आशे प्रतिपादन केले. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरुवात झाली.तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई हे महाराष्ट्र राज्यातील गुणवंतांना पुरस्कार वितरीत करीत आहेत. हा पूरस्कार आमच्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरत आहे.
कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून आंबेडकरी चळवळीचे युवा नेते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिपभाऊ गवई हे होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये प्रा. वाघ साहेब, स्नेहल वानखडे, आसमा आत्राम, रफिकभाई कुरेशी, फिरोजभाई शहा, अख्तर कुरेशी, संदिप राऊत, प्रविण सरदार प्रमुख अतिथींच्या स्वागत व सत्कारानंतर तथागत ग्रुप चे मार्गदर्शक प्रा. वाघ साहेब यांनी प्रास्तविक सादर केले.त्यानंतर राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दिलीप खरात, स्नेहल वानखडे, प्रा. वाघ साहेब, आसामा आत्राम, रफिकभाई कुरेशी, अख्तरभाई कुरेशी,संदिप राऊत यांच्या हस्ते पुरस्कार हा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व पुरस्कार कर्त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रफिकभाई कुरेशी यांनी तर आभारप्रदर्शन तथागत ग्रुपचे मार्गदर्शक फिरोजभाई शहा यांनी केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध