Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ एप्रिल, २०२६
तहसीलदार मुकेश कांबळे यांचे आवाहन दिंडोरीतील मिरवणुका शांततेत पार पाडा.
बापू चव्हाण -
आगामी सण-उत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देत मिरवणुका शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन केले.
प्रांत कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीस तहसीलदार मुकेश कांबळे,पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे,नायब तहसीलदार श्रीमती दराडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरपंचायतीचे कर्मचारी व उत्सव समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत मिरवणूक मार्गावर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष भर देण्यात आला. कमी उंचीवरील विद्युत तारा दुरुस्त करणे,प्रत्येक मिरवणुकीसोबत वीज वितरण विभागाचे कर्मचारी ठेवणे तसेच रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले.शहरातील सर्व मिरवणुका शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करून उपस्थितांचे आभार मानले.यावेळी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नंदुरबार प्रतिनिधी :- आज सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी संत श्री भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम शहरातील नव...
-
नंदुरबार प्रतिनिधी :- संत भिमा भोई जन्मोत्सवानिमित्त येथील नवी भोई गल्लीतील भोई सामाजिक भवनात नंदुरबार शहर व उपनगर संत भिमा भोई जयंती उत्सव ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा