Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १५ एप्रिल, २०२६
वणी नगरीत 'संवेगरंगोत्सव- ७' चा जयघोष; ९ मुमुक्षू घेणार भागवती दीक्षा
वणी नगरीत 'संवेगरंगोत्सव-
७' चा जयघोष; ९ मुमुक्षू घेणार भागवती दीक्षा.
महेंद्र लोढा :-
सप्तशृंगी मातेच्या पावन गडपायथ्याशी वसलेल्या वणी नगरीत अध्यात्माचा अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे. श्री पार्श्वभ्युदय तीर्थाच्या सुरम्य संकुलात 'संवेगरंगोत्सव-७' अंतर्गत विविध सात धार्मिक प्रसंगांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये ९ पुण्यात्मा मुमुक्षू संसाराचा त्याग करून भागवती दीक्षा ग्रहण करणार आहेत.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण समूह दीक्षा
येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजता ९ मुमुक्षूंची समूह दीक्षा संपन्न होईल. यामध्ये विशेष म्हणजे ४८ वर्षीय राहुलभाई मेहता नाशिक (एम.एन.सी. कंपनीत सीनियर मॅनेजर) आणि त्यांच्या ४५ वर्षीय पत्नी अल्पाबेन मेहता हे दाम्पत्य एकत्र दीक्षा घेत आहेत. त्यांच्यासह मुमुक्षू रीचुकुमारी रिचबेन शाह मुंबई (२५ वर्षे) भायंदर , मुमुक्षू विधिकुमारी विधिबेन चौहान (२२ वर्षे),भयंदर मुमुक्षू दृष्टिकुमारी शिरोईया (१८ वर्षे) आणि मुमुक्षू उर्वीकुमारी उर्फ बोरिवली दृष्टीबेन कांकरीया (१७ वर्षे) विघाबेन भायंदर रुचिकाकुमारी, सरिजबेन हेमलबेन यांचा संयमपथावर प्रवेश होणार आहे.
सप्तरंगी महोत्सवातील प्रमुख कार्यक्रम
हा महोत्सव केवळ दीक्षेपूरत मर्यादित नसून, त्यात भक्तिरसाचे विविध रंग पाहायला मिळतील:
ईक्षुरसोत्सव (२० एप्रिल): वर्षीतप करणाऱ्या तपस्वींचे पारणे.
पंचकल्याणक अंजनशलाका (२१ एप्रिल): सुवर्णमय प्रभू प्रतिमांचे अंजन विधान.
गुरुमूर्ति प्रतिष्ठा (२९ एप्रिल): नवनिर्मित शिल्पकला समृद्ध मंदिरात गुरुमूर्तींची प्रतिष्ठापना.
अनुज्ञा ओवारणा उत्सव (१ मे): 'महा-पुण्य' गुरु परिवारातील ४ गणि-मुनींना 'पंन्यास पद' प्रदान केले जाईल.
जिनवचनोत्सव (१ ते ३ मे): तीन दिवसीय वाचना श्रेणीचे आयोजन.
ऐतिहासिक योगायोग
या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ७० वर्षांपूर्वी याच पावन भूमीवर आणि याच तिथीला गच्छाधिपती पू.आ.भ. श्रीमद् विजय पुण्यपालसूरीश्वरजी महाराजांची दीक्षा संपन्न झाली होती. त्यांच्याच पावन स्मृतीप्रीत्यर्थ हा सोहळा 'शासन यंग ब्रिगेड' आणि विविध गुरुभक्त परिवारांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
साधु-साध्वींची अलोट उपस्थिती
या सोहळ्यासाठी गच्छस्थविर पू.आ.भ. श्रीमद् विजय ललितशेखरसूरीश्वरजी म.सा., गच्छाधिपती पू.आ.भ. श्रीमद् विजय पुण्यपालसूरीश्वरजी म.सा. यांच्यासह अनेक आचार्य, गणि, मुनी आणि साध्वीजींची विशाल उपस्थिती लाभणार आहे. वर नमूद रिचूबेन, दृष्टीबेन, राहुलभाई, अल्काबेन,रिचूबेन विधिबेन
श्री अमीझरा शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थ, नाशिक-सापुतारा हायवे, वणी.या स्थळी सदरील कार्यक्रम संपन्न होणार आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा