Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

मालेगावातील दुहेरी खुनाचे गुन्हयातील आरोपी उत्तरप्रदेश राज्यातुन जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.



    संदीप अवधूत :-
दि. ०८/०४/२०२६ रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाणेस गुरनं ८४/२०२६ भा.न्या.सं. कलम १०३(१), १०९, ३(५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील मयत नामे १) निखील भोला सहाणी, वय १८, व २) अनिश उर्फ गालु भोला सहाणी, वय २८, दोघे रा. आयोध्यानगर, सोयगाव, मालेगाव, मुळ रा. गोरखपुर, राज्य उत्तरप्रदेश अशा दोघांना आरोपी नामे मोहम्मद रजा व ऑन अब्बास उर्फ ऑन भाई, रा. हल्लोर, सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश यांनी पैशांचे देवाण-घेवाणी बाबत वाद घालुन वरील दोन्ही मयतांना धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते.सदर घटनेच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प विभाग सिध्दार्थ बारवाल, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभागी दर्शन दुगड, यांनी तात्काळ दखल घेवुन यातील आरोपीतांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांना सुचना दिल्या होत्या. सदर गुन्हयातील आरोपीतांनी गुन्हा केल्यानंतर पलायन केले होते, मालेगाव व मनमाड परिसरात त्यांचा शोध घेतला असता ते उत्तरप्रदेश राज्यात गेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास उत्तरप्रदेश राज्यातील सिध्दार्थनगर जिल्हयात तपासकामी रवाना करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सिध्दार्थनगर जिल्हयातील डुमरियागंज तालुक्यात सतत दोन दिवस रात्र पाळत ठेवुन हल्लोर शिवारातुन खालील आरोपीतांना शिताफिने ताब्यात घेतले.१) रजा कैसर अब्बास, वय १९, रा. हल्लोर, ता. डुमरियागंज, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश २) औन मंजु अब्बास उर्फ ऑन भाई, वय २०, रा. हल्लोर, ता. डुमरियागंज, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश सदर आरोपीतांना वरील गुन्हयाचे तपासात विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्यांनी दोघांनी मिळून पैशांचे वादावरून यातील मयत नामे निखील सहाणी व अनिश सहाणी यांना धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर दोन्ही आरोपीतांना मालेगाव छावणी पोलीस ठाणे कडील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची ०५ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मालेगाव छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक जाधव व सपोनि योगेश पाटील हे करीत आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प विभाग सिध्दार्थ बारवाल, सहा. पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभागी दर्शन दुगड यांचे मार्गदर्शन सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, मालेगाव छावणी पो.स्टे. चे पोनि दिपक जाधव, सपोनि योगेश पाटील, तसेच स्थागुशाचे पोउनि दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार शाम पवार, शरद मोगल, योगेश कोळी, विशाल गोसावी, सचिन वराडे, नरेंद्र कोळी, संदिप राठोड, तांत्रिक विभागाचे पोहवा हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे यांचे पथकाने सदर आरोपीतांचा शोध घेवुन वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध