Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ मे, २०२६
लसीकरण सुरु असतानाच ६ फूट सापाचे दर्शन.
बापू चव्हाण दिंडोरी :-
ओझर येथील उपनगर टिळक नगर परिसरातील अंगणवाडी येथे मंगळवार दि.२८ रोजी सकाळी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत लसीकरण सुरु झाले.या दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तब्बल सहा -साडे सहा फूट लांबीच्या सापाचे दर्शन झाले.
सविस्तर माहिती अशी की, ओझर ता निफाड येथील टिळक नगर परिसरात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी मध्ये राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत लसीकरण सुरु झाले होते. परिसरातील व ओझर गावातील नागरिक आपल्या ० ते ५ वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यासाठी घेऊन येत होते, दरम्यान अंगणवाडी मधील वस्तू घेण्यासाठी कर्मचारी आतील खोलीत गेले असता तब्बल सहा साडेसहा फूट लांबीचा साप फिरताना दिसला. हे दृश्य बघताच महिला कर्मचारी प्रचंड घाबरल्या.त्यांनी तातडीने ए.आर.इ.ए.एस फाउंडेशनचे संचालक व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांना मोबाईल द्वारे कळवले.घटनेची गांभीर्य लक्षात घेताच रणशूर यांनी तातडीने अंगणवाडीत पोहोचून शिताफीने धामण जातीच्या सहा साडेसहा फुटी लांबीच्या सापास पकडले,साप पकडताच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.पंधरा दिवसात दुसऱ्यांदा धामण जातीचा साप पकडण्यात आला.दि १५ एप्रिल रोजी ही सकाळ च्या वेळेस रणशूर यांनी साप पकडला होता.
चौकट १) अंगणवाडी इमारतीस आरपार भगदाड.उंदरांचा सुळसुळाट.
टिळक नगर अंगणवाडी इमारतीचे आतील बाजूची संपूर्ण फरशी उचकटलेली असून इमारतीस मोठे मोठे भगदाड पडलेले आहेत.हे भगदाड इतके मोठे आहेत की अंगणवाडीच्या आतून बाहेरची बाजू स्पष्ट दिसते यामुळे उंदरांचा वावर येथे मोठ्या प्रमाणावर आहे याच कारणाने सापांचाही वावर नेहमीच या अंगणवाडीत असतो मात्र लहानग्या बालकांसह अंगणवाडी कर्मचारी व येथे येणाऱ्या पालकांचाही जीव धोक्यात असल्याचे पाहायला मिळते.
चौकट :- २) १जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष.
ओझर गावं हे आता नगरपरिषद अधिकार क्षेत्रात येत आहे मात्र जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळा,अंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे आहेत.या सारख्या अनेक इमारतींचे बांधकामाची वाईट अवस्था आहे. जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार यांनी वेळीच लक्ष देऊन टिळक नगर अंगणवाडी इमारती दुरुस्ती करून तसेच जिल्हा परिषद शाळांची देखभाल दुरुस्ती करून देण्याची मागणी स्थानिकांसह पालकांनी केली आहे.
प्रतिक्रिया
अनेकदा जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाडी यामध्ये विषारी बिनविषारी साप पकडलेले आहेत. मोडकळीस आलेल्या बांधकामामुळे उंदीर मोठ्या प्रमाणावर इमारतीत प्रवेश करतात.सापाचे प्रमुख व आवडते खाद्य उंदीर असल्याने मोठ्या प्रमाणावर साप येतात.उंदीर नसेल तर साप देखील येणार नाहीत. अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेमधून अनेकदा साप पकडण्यासाठी फोन येतात मात्र तिथे गेल्यावर बिळांची संख्या व भगदाड मोठे असल्याने बऱ्याचदा साप लपून बसतात मिळून येत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी धोका आणखीन वाढतो.
सुशांत रणशूर,
(वन्यजीव अभ्यासक,ओझर)
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा