Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२६
शिरपूर न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; ६५ कर्मचारी सहभागी
शिरपूर प्रतिनिधी :- उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतन श्रेणीनुसार वेतनवाढ मिळावी, या मागणीसाठी आज दि. १७ नोव्हेंबर २०२६ पासून जिल्हा व तालुका न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
शिरपूर तालुका न्यायालयातील जवळपास ६५ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. यात अधीक्षक एल. एल. गायकवाड, बी. आर. बागुल, लघुलेखक के. एम. पाटील, मुकेश मोरे, संदीप मराठे, सहाय्यक अधीक्षक सौ.एम.आर.ठाकूर, राजेश सोनवणे, प्रशांत कोठावदे, सुनील भिंगारे यांच्यासह सर्व वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, बेलिफ, शिपाई, पहारेकरी यांचा समावेश आहे.
संपूर्ण धुळे जिल्ह्यातून सुमारे ४५० तर महाराष्ट्र राज्यातून जवळपास ३४ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
२२ महिन्यांपासून प्रस्ताव प्रलंबित
मा. उच्च न्यायालयाकडून दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जवळपास २२ महिने उलटूनही शासनाकडून वेतनवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही.
वेतनवाढीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना इतिहासात प्रथमच संप करण्याची वेळ आली असल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
शासनाने न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर प्रस्ताव मंजूर करावा, असे आवाहन संपकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे. जोपर्यंत शासन वेतनवाढीचा प्रस्ताव मंजूर करत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा निर्धार कर्मचारी संघटनेमार्फत करण्यात आला आहे.
संपामुळे शिरपूर न्यायालयातील कामकाज ठप्प झाले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर :- क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त लोक संघर्ष मोर्चा, आदिवासी पारधी विकास परिषद, आदिवासी पारधी क्रा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा