Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३१ मे, २०२६

८९४ कथित बनावट शालार्थ नोंदींचे प्रकरण तापले! २२ जूनच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष



नाशिक प्रतिनिधी:- राज्यात गाजत असलेल्या ८९४ कथित बनावट शालार्थ नोंदींच्या प्रकरणाने आता निर्णायक वळण घेतले असून, येत्या २२ जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे शिक्षण क्षेत्रासह संबंधित सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हे दाखल झाल्यानंतर शिक्षक, कर्मचारी आणि काही अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, तक्रारदार डॉ.पंकजदादा साळुंखे यांनी दाखल केलेल्या इंटरव्हेन्शन अर्जामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाल्याचे मानले जात आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले विविध मुद्दे आता न्यायालयीन प्रक्रियेत समोर येत असल्याने संबंधितांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे.

२२ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत विविध याचिका, कागदपत्रे आणि दावे-प्रतिदावे न्यायालयासमोर मांडले जाण्याची शक्यता असून, ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, तक्रारदार पंकज साळुंखे यांनी "तरुण गर्जना" वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे प्रकरण शेवटपर्यंत लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात नेमके सत्य काय, कोण जबाबदार आणि कोण निर्दोष याचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार असला, तरी २२ जूनची सुनावणी अनेकांसाठी निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात रंगू लागली आहे.
आता सर्वांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहेत — २२ जूनला नेमके काय घडणार?



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध