Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३० मे, २०२६

सनराईज हायस्कूल मधील शिक्षकावर वडनेर भैरव पोलीस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल.




 गु.र.नं. १२३/२०२६ भा.न्या.स. कलम ७४ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम २०१२ चे कलम १२ सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे फिर्यादी परसराम विठ्ठल तागड, वय-३७ वर्षे, व्यवसाय-नोकरी, नेम. वडनेर भैरव पोलिस स्टेशन ता. चांदवड जि.नाशिक 
यांनी अंदाजे 1५ वर्षीय पीडितेवर अन्याय करणारा 
आरोपी मन्सुर सादिक मनियार, वय ३१ वर्षे, रा. खेडगाव ता. दिंडोरी जि. नाशिक याच्यावर पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला सदरील प्रकार दि.१०.११.२०२५ ते दि. १२.११.२०२५ दरम्यान सनराईज हायस्कुल, वडनेर भैरव ता. चांदवड जि.नाशिक व ब्रम्हा व्हॅली इन्स्टीट्युट, त्र्यंबकेश्वर ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक या ठिकाणी प्रकार घडला असून वरील तारीख वेळी व ठिकाणी वडनेर भैरव गावातील सनराईज स्कुलमधील शिक्षक मन्सुर सादिक मनियार याने सदर शाळेत शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी वय अंदाजे १५ वर्षे हिला सनराईज हॉयस्कुल, वडनेर भैरव येथुन विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदविण्याच्या नावाखाली ब्रम्हा व्हॅली येथे घेवून जावून तिचे आक्षेपार्ह फोटो हे स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून घेतले व सद्यस्थितीत तिला सदर फोटो पाठवून ब्लॅकमेल केले म्हणुन गुन्हा पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मन्सूर मणियार याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठळी सुनावली या गुन्ह्यांचा तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ हे करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध