Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २१ जून, २०२६

लग्नाचा मंडप सोडण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू.



वणी प्रतिनिधी :- 
वणी येथे लग्नाचा मंडप सोडण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा मंडप सोडताना लोखंडी पाईप वरून गेलेल्या विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे
        याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, वणी येथे कृपा हॉस्पिटल परिसरात राहणारे नंदलाल गावित यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे घरापुढे मंडप दिलेला होता. शिवरे येथिल मंडप व्यावसायिक ऋषीकेश कैलास मत्सागर वय २७ रा. शिवरे, हा दिनांक २० रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गावित यांच्या घरा समोर दिलेला मंडप काढण्यासाठी गेलेला होता. त्यावेळी मंडपाचा लोखंडी पाईप काढते वेळी त्यावरुन गेलेल्या विजेच्या तारेच्या संपर्क झाल्याने जोराचा झटका बसुन तो जमिनीवर कोसळला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यास खाजगी रुग्णालयात नेले . तेथिल डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यांनतर त्यास वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत झालेला ऋषीकेश वर घरातली जबाबदारी होती. पाच वर्षांपुर्वी त्याचे वडील कोरोना काळात मृत झाले होते. त्याच्या पश्चात एक बहिण व लहाण भाऊ आहे. गेल्या पाच सहा वर्षा,पासुन मंडप व्यवसायात त्याने चांगला जम बसवला होता. माऊली मंडप डेकोरेटर्स म्हणुन प्रसिद्ध होता. संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर असल्याने घरातला कर्ता पुरुष गेल्याने परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली. सदर अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत वणी पोलिसांत सुरू होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध