Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ जुलै, २०२६

वणी येथील तिळेश्वर महादेव मंदिरात पुराचे पाणी.


संदीप अवधूत :-
दिंडोरी ( वणी ) : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर परिसर जलमय झाला. मंदिरात पुराचे पाणी शिरल्याचे दृश्य पाहून भाविकांच्या भावना अनावर झाल्या.
विविध वर्षांची आध्यात्मिक परंपरा जपणारे तिळेश्वर महादेव मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात पाणी शिरल्याची माहिती मिळताच अनेक भाविकानी मंदिर परिसरात धाव घेतली. काहींनी सुरक्षित अंतरावरून दर्शन घेत "हर हर महादेव"चा जयघोष केला, तर अनेकांनी परिसरातील सर्व नागरिक सुरक्षित राहावेत आणि संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध