Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६
Home
/
/
मोहाडी श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला पुष्प तिसरे अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग जिद्दीतूनच,डॉ.भावेश भाटिया.
मोहाडी श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला पुष्प तिसरे अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग जिद्दीतूनच,डॉ.भावेश भाटिया.
बापू चव्हाण दिंडोरी
जीवनात कितीही अडचणी आणि संकटे आली तरी जिद्द, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यावर मात करता येते.परिस्थितीचा बाऊ न करता ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली,तर अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग नक्कीच सापडतो,असा प्रेरणादायी संदेश प्रसिद्ध उद्योजक व वक्ते डॉ.भावेश भाटिया यांनी दिला.
दिंडोरी तालुक्यातील पाऊस मोहाडी येथील श्री अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान आयोजित व कर्मयोगी कै.एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन संयोजित श्री अष्टबाहू गोपालकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला २०२६चे तिसरे पुष्प ‘अंधारातून उजेडाकडे या विषयावर गुंफताना डॉ.भावेश भाटिया बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे संचालक डॉ.एस. के.शिंदे होते.हे पुष्प ग्रामस्थांच्यावतीने कुमारी तन्वी राजेंद्र जाधव हिच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले.डॉ.भावेश भाटिया यांनी आपल्या जीवनातील संघर्ष,प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात आणि उद्योजकीय वाटचालीतील अनुभव सांगत उपस्थितांना प्रेरित केले. अडचणींना संधीमध्ये रूपांतरित करण्याची वृत्ती प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.मनातील सकारात्मक विचार,मेहनत आणि ध्येयावरची निष्ठा यामुळे जीवनातील अंधार दूर करून यशाचा प्रकाश निर्माण करता येतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मविप्र संचालक प्रवीण जाधव,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव,अरुण पिंगळे, केशव जाधव,मोहाडी येथील युवा उद्योजक जालिंदर गोवर्धने, राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमास मोहाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ,महिला, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्याख्यानातून मिळालेल्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित भारावून गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विलास देशमुख सूत्रसंचालन धनंजय वानले तर आभार प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी मानले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा