Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२६

वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांची उत्कृष्ट कामगिरी फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी तात्काळ जेरबंद.


माधव खाबिया :-

सोन्याचे खोटे नाणे देऊन फिर्यादीची ५,००,०००/- रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नं. २७४/२०२६, भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३(५) अन्वये दिनांक २६/०९/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २१/०९/२०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.३० वाजेच्या दरम्यान, फिर्यादी दिलीप परशराम मोर, वय ६८ वर्षे, व्यवसाय शिवणकाम, रा. शिंपी गल्ली, कसबे वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक, ह.मु. कृपा हॉस्पिटलजवळ, कसबे वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक यांच्या राहत्या घरी आरोपींनी संगनमत करून त्यांच्या जवळील पोटली (कापडी पिशवी) मधील गिन्या (नाणी) सोन्याची असल्याचे भासवून फिर्यादीस दिल्या. त्याबदल्यात फिर्यादीकडून ५,००,०००/- रुपये रोख रक्कम घेऊन, फिर्यादीस पिवळ्या धातूची खोटी गिन्या (नाणी) देऊन त्यांची फसवणूक केली. सदर बाबत वणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तपासादरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्यांची नावे :-१) तेजलवेन आनंदबाई वाघीरी, वय ३५ वर्षे, रा. छहानी जकातनाका, तलाव के सामने, शामसुंदर सोसायटी नं. ३१, वडोदरा, राज्य गुजरात.२) वाघीरी श्रद्धावेन धिरुबाई, वय ७३ वर्षे, रा. ४६, तुलसी चौक, किसनवाडी बट एरिया, हरिकृपा मोहल्ला, अजवा रोड, गुजरात.
३) रेखाबेहन अनिलभाई वाघीरी, वय ३४ वर्षे, रा. ब्लॉक नं. २३, रूम नं. १४, BSUP आवास योजना, किसनवाडी, अजवा रोड, वडोदरा, राज्य गुजरात.४) पप्पुभाई दुग्लभाई सोवासीया, रा. ६० झोपडपट्टी, बिहाइंड जोगनी माता टेम्पल, नियर बापोड जकातनाका, वाघोडिया रोड, वडोदरा, राज्य गुजरात.
सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी सहा पोलीस निरीक्षक हेमंत फड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे, पोलीस हवालदार मुज्जू देशमुख व पोलीस शिपाई निलेश तेलंगे असे पोलीस पथक तयार करून कळवण, देवळा, चांदवड व मनमाड या परिसरात जाऊन आरोपींचा शोध घेण्यात आला.
दरम्यान, आरोपी क्र. १ ते ३ हे मनमाड शहर परिसरात मिळून आले. त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात फसवणूक केलेली एकूण ५,००,०००/- रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे यांनी करून आरोपी निष्पन्न केले असून, आरोपींना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे, वणी पोलीस ठाणे, करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध