Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२६

पालखेड: महामार्ग पोलीस व संघर्ष ग्रुपतर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती व्याख्यान संपन्न पालखेड, दि. ३० सप्टेंबर २०२६.



माधव खाबिया :-
महामार्ग पोलीस केंद्र, पिंपळगाव बसवंत व संघर्ष ग्रुप, पालखेड यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती सप्ताहानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, पालखेड येथे रस्ता सुरक्षा विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक दीपक अहिरे, श्रावण केदार, पोलीस हवालदार दीपक शार्दुल व राकेश धोंगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख वक्ते दीपक अहिरे व श्रावण केदार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्व, वेगावर नियंत्रण, रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. "अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे हाच एकमेव उपाय आहे," असा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय दिघे जेष्ठ शिक्षक अशोक शेळके सर, श्री. कागदे सर व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.प्रामाणिक विद्यार्थिनींचा गौरव
विद्यालयातील विद्यार्थिनी कु. ईश्वरी जाधव व कु. श्रद्धा कोकाटे यांनी शाळेच्या मैदानावर सापडलेले ४०० रुपये प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचा उपस्थित पोलीस अधिकारी व संघर्ष ग्रुपच्या वतीने बक्षीस देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वांनी कौतुक केले.
यानंतर पोलीस हवालदार श्री. दीपक शार्दुल यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याची सामूहिक प्रतिज्ञा दिली.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पोलीस अधिकारी तसेच संघर्ष ग्रुपचे प्रमुख ज्ञानेश्वर थेटे, मनोज सासवडे, मनोज लोढा, नाना भोगे, सोमनाथ खैरनार, भारत हिरे, बंटी शिंदे, दिगंबर भोई हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सावन जाधव सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अशोक शेळके सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध