Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २५ ऑक्टोबर, २०२६

वणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुमारे तीन लाख एक्यान्नव हजार सातशे शेचाळीस रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त.


संदीप अवधूत /माधव खाबिया :-
वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड व त्यांच्या टीमचे कार्य कौतुकास्पद पोलीस अधीक्षक डी एस स्वामी व उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदशानाखाली वणी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड व त्यांच्या टीमने सुमारे ३, ९१, ७४६ रुपयांचा अवैध दारू मद्यसाठा जप्त केला असून बाबत पोलीस कोंस्टेबल तुषार शाम सोनवणे नेमणूक वणी पोलीस ठाणे यांनी भा.न्या.सं. २०२३ चे कलम १२३ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(अ), ६५(ब), ६५(क), ६५(ड), ६५(ई), ६५(फ), ३, १०८ प्रमाणे आरोपी सुमित अशोक कदम, वय ३2 वर्ष रा. कोराटे ता दिंडोरी जि नाशिक, ज्ञानेश्वर नंदू नाठे रा. निळवंडी पाडा ता दिंडोरी जि नाशिक यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली सदरील प्रकार दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी अंबानेर शिवारात असलेल्या हॉटेल मल्हार येथे घडला आरोपी यांच्या ताब्यात मिळालेला मुद्देमाल
१) ६०,३००/- रुपये किमतीच्या ऑफिसर चॉइस ब्लू कंपनीच्या एकूण ३६५ क्वार्टर बाटल्या, प्रत्येकी १८० मि.ली. मापाच्या व २२०/- रुपये छापील किंमत असलेल्या वेगवेगळे बॅच नंबर असलेले सिलबंद बाटल्या.
२) ५८,७५०/- रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या एकूण ३३४ क्वार्टर बाटल्या, प्रत्येकी १८० मि.ली. मापाच्या व २५०/- रुपये छापील किंमत असलेल्या वेगवेगळे बॅच नंबर असलेल्या सिलबंद बाटल्या.
३) २०, ०००/- रुपये किमतीचा एक प्लास्टिक जार (कॅन), त्यात २० लिटर असलेले रसायन
४) १,४४०/- रुपये किमतीच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या एकूण १८० रिकाम्या काचेच्या बाटल्या, प्रत्येकी १८० मि.ली. मापाच्या, वेगवेगळे बॅच नंबर असलेल्या बाटल्या.
५) २५६/- रुपये किमतीच्या ऑफिसर चॉइस ब्लू कंपनीच्या एकूण 32 रिकाम्या काचेच्या बाटल्या, प्रत्येकी १८० मि.ली. मापाच्या, वेगवेगळे बॅच नंबर असलेल्या बाटल्या.
६) १०००/- रुपये किमतीचे एक स्टीलचे पंचपात्री, ३ नग प्लास्टिकचे रिकामे जार (कॅन), २ नग प्लास्टिकचे मग, २ नग प्लास्टिकचे सिलबंद बाटल्यांचे झाकण, जुने वापरते साहित्य.
७) १, २०,०००/- रुपये किमतीची अल्टो कार, ग्रे रंगाची, तिचा रजिस्ट्रेशन नंबर MH.१५ BX.०९८७ असा असलेली जुनी वापरती किंमत.
८) ४०,०००/- रुपये किमतीचा एक ओप्पो आय फोन (फोटोतील मजकूर अस्पष्ट आहे), १२ कंपनीचा मोबाइल, त्यात एअरटेल कंपनीचे सिम कार्ड नंबर ८३०८९०६८०२असा असलेला जुना वापरता किंमत.
एकूण : ३,९१,७४६/- रुपये. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून
नमूद तारखेस, वेळी व ठिकाणी यातील आरोपीत मजकूर यांनी संगनमत करून सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे, याची चांगले प्रकारे जाणीव असताना व शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना ऑफिसर चॉइस ब्लू व रॉयल स्टॅग कंपनीचे लेबल लावून बनावट विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या, रसायन, वाहतुकीस लागणारी अल्टो कार, मोबाइल व साहित्य साधने असे एकूण किंमत रुपये ३,९१,७४६/- चे मुद्देमालासह बनावट दारू तयार करून विक्री करण्याच्या उद्देशाने शासनाचा कोणताही परवाना नसताना मिळून आले म्हणून.गुन्हा दाखल करण्यात आला असून
दाखल अंमलदार पोहवा पी. आर. शेलार, नेमणूक वणी पोलीस ठाणे यांनी दाखल केला असून वणी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांचे काम खरोखर कौतुकास्पद असल्याचे निदर्शनास येते. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक डी एस स्वामी, कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हदेव शेळके, वणी पोलीस ठाण्याचे दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवणे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध