Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२६

दिंडोरी प्रतिनिधी - मटका जोमात, अभोणा पोलीस कोमात.अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंबरगव्हाण, मांगलीदार, बोळकी पाडा, येथील अवैध धंद्याना अभोणा पोलिसांचा आशीर्वाद कि मेहेरबानी.





दिंडोरी :- कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोळकी पाडा, उंबरगव्हाण, मांगलीदार या भागात अवैध मटका व्यवसाय जोमात, अभोणा पोलीस अधिकारी, कर्मचारी कोमात अशी अवस्था झाली आहे. यामुळे अनुसूचित जमाती महिला भगिनींचे संसार धोक्यात आले आहेत. ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी विशेष कर्तव्यदक्ष पथक नेमून या भागातील अवैध धंदे बंद करावे अशी मागणी महिलांनी केली आहे.
अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याना उत आला असून येथील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारी वाढत आहे. अवैध धंदे करण्यासाठी कळवण तालुक्याचा पश्चिम पट्टा सुरक्षित असल्याने व तेथील बांधव गरीब असल्याने त्यांच्या परिस्थिती चा गैरफायदा घेत व्यवसायिकानी उंबरगव्हाण, मांगलीदर, बोळकी पाडा या भागाकडे विशेष मार्ग वळवीला आहे. घरातील कर्ते पुरुष अवैध मटका, जुगार खेळत असल्याने महिलांवर अन्याय होत आहे त्यांना शेती,शेतात मोलमजुरी, कष्ट करण्याची वेळ आली आहे. तसेच तरुण, कर्ते पुरुष गुटखा, दारूच्या आहारी गेल्याने महिलांवर लहान मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. महिलांनी रोजंदारीने कमवलेले पैसे घरातील पुरुषांना न दिल्यास त्यांना मारहाण होत असल्याचे चित्र समोर दिसत आहे
त्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी विशेष गोपनीय पथकाची नेमणूक करून अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंबरगव्हाण, बोळकी पाडा, मांगलीदर परिसरातील अवैध धंदे उध्वस्त करावेत अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.


१) चौकट - अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्द ही गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने या भागातून संपूर्ण जिल्ह्यात अवैध गुटखा सापुतारा,हतगड, गडकूल, सामगव्हाण मार्गे बोळकी पाडा मार्गे कळवण तालुक्यात आणला जात असल्याचे समजते. मात्र पोलिसांच्या "अर्थपूर्ण " व्यवहारामुळे राजरोस गुटखा तस्करी सुरु आहे. स्थानिक नागरिक


चौकट - दबंग अधिकारी द्या स्थानिक नागरिकांची मागणी -

अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध अवैध मटका, वाळू, मुरूम धंदे, असे अनेक प्रकार थांबविण्यात अभोणा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. त्यामुळे येथील कायदा व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी तात्काळ एक दबंग अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध