Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० जून, २०१९

तहसील कार्यालयात वृध्दाचे नग्न आंदोलन;सोलापूर तहसील कार्यालयातील घटना

घटना

सोलापूर  प्रतिनिधी  : संजय गांधी निराधार अनुदानासाठी सोलापुरात वृद्धाने नग्न आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवला. सोलापूर उत्तर तहसील कार्यालयात पूर्ण कपडे काढून एका वृद्धाने अनुदानासाठी आंदोलन केलं. आंदोलन कर्त्या वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या मिळणाऱ्या संजय गांधी निराधार विभागाच्या वागणुकीला कंटाळलेल्या वृद्धाने चक्क नग्न होवून प्रशासनाकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केलाय. बँकेकडे निराधार अनुदान न आल्याने बँकेने स्पष्ट केल्याने वृद्धाने येथील संजय गांधी निराधार कार्यालयाकडे याबाबत तोंडी विचारणा केली असता यांच्या तक्रारीची येथील अधिकारी कर्मचारी दखल घेत नसल्याने वृद्धाने चक्क नग्न होवून यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

वृद्धाच्या या नग्न पावित्र्याने कार्यालयात एकच खळबळ माजली. या घटनेनंतर आंदोलन कर्त्या वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तहसील कार्यालयात यावेळी महिला पुरुष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एक नग्न कार्यालयात येत असल्याने नागरिकांना काही कळले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध