Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० जून, २०१९

शिरपुर येथे शेजार युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन




कुरखळी प्रतिनिधी :योगेश्वर मोरे 

युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार तसेच नेहरू युवा केंद्र धुळे व स्व अण्णासो दरबारसिंग राजपूत प्रतिष्ठान भावेर यांचा संयुक्त विद्यमाने शेजार युवा संसद कार्यक्रम किसान विद्या प्रसारक संस्था शिरपुर येथे नुकतास संपन्न झाला. कार्यक्रमाचा सुरवातीला स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन पंकज शिंदे(कार्यक्रम समन्वयक) कार्यक्रमाचे अध्यक्ष के. पी. पाटील (मुख्याध्यापक) तसेच डी. बी. अहिरराव (पर्यवेक्षक), जे. डी. कुवर,पी. आर. सोनवणे,प्रा. योगेश शेटीया,दर्शना राजपूत, श्रीकृष्ण शिरसाठ इत्यादींचे व्यसनमुक्ती, सोशल मीडियाचा गैरवापर,वृक्षलागवड भविष्यात फायदयाचे, योगा दिनानिमित्त मार्गदर्शन लाभले तर प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष भटेसिंग राजपूत यांनी केले. या प्रसंगी कुरखळी ग्राम सर्वांगीण विकासमंच प्रमुख योगेश्वर मोरे यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमात 80 हुन अधिक युवा व युवती उपस्थित होते


 शिरपूर कुरखळी योगेश्वर मोरे प्रतिनिधी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध